
Pune News : पुण्यातील खराडी येथील रेव पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
त्यानंतर या खराडी रेव्ह पार्टी प्रकरणांमध्ये रोज नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. खेवलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणात असली व्हिडिओज आणि फोटो समोर आले आहेत. याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेत महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मोठे खुलासे केले. त्यानंतर या प्रकरणात सायबर पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केलेला आहे.
दरम्यान, या प्रकरणांमध्ये सुरुवातीपासूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) या यामध्ये काही षडयंत्र असण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर या खेवलकर प्रकरण देशातील सर्वात मोठं कांड असण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. त्यामुळे दादांच्या दोन रूपाली एकमेकांविरोधात भिडल्या असल्याचं पाहायला मिळत आहेत.
अशातच आता खेवलकरांवर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली पाटील ठोंबरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.रूपाली पाटील ठोंबरे सरकारनामाशी बोलताना म्हणाल्या, मी एक राजकारणी असले तर त्याचबरोबर वकील देखील आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या मी माध्यमांसमोर मांडत होते.
आता या प्रकरणांमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओबाबत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास पोलीस करतील. मात्र, सध्या महाराष्ट्रामध्ये यापेक्षाही महिलांच्या बाबतीमध्ये गंभीर घटना घडत आहेत. त्या घटनांकडे महिला आयोगाने लक्ष देणे आवश्यक आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलच्या हिडन फोल्डर मधून जे व्हिडिओ समोर आलेले आहेत. आता ते व्हिडिओ आनंदाच्या आहेत, संमतीचे आहेत, की दुःखाच्या आहेत किंवा बळजबरीने काढलेले आहे. हे सर्व तपासात समोर येईलच असं रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.
या प्रकरणांमध्ये महिल आयोगाच्या एन्ट्रीबाबत विरोधकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, या प्रकरणाबाबत ज्या महिलेने महिला आयोगाकडे तक्रार केली. तीच एक एनजीओ असून ती आमच्या पक्षाच्या निगडित असल्याचे देखील सांगितलं जात आहे. मात्र, या प्रकरणातील महिलांनी समोर येणे आवश्यक आहे. तसंच या प्रकरणात तक्रार केल्यानंतर ही तक्रार खरी का? खोटी हे पोलीस तपासानंतर समोर येईल.
प्रांजल खेवलकर यांच्यावर जो पहिला गुन्हा दाखल झाला. तपासातल्या त्रुटी मी कोर्टाच्या अनुषंगाने सांगितल्या. मात्र, त्यानंतर आता तपासामध्ये त्यांचे अनेक अश्लील फोटो समोर आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे असं जर झालं असेल तर खेवलकर हे हवस के पुजारी असतील आणि ते तपासात समोर येईल. मात्र, ती हवस संमतीची होती,आनंदाची होती दुःखाची होती, की बळजबरीची होती, ही गोष्ट तपासानंतर पाहावी लागेल. या प्रकरणामध्ये कट कारस्थान होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच महिला आयोगाच्या इंट्रीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
यावर बोलताना रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, या प्रकरणांमध्ये महिला आयोगाचा तसा यामध्ये रोल नाहीये. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष का? बोलत आहेत माहित नाही पण त्या बोलत असतील तर बोलू द्या. मात्र जर चुकीचं झालं तर महिला आयोगावर देखील सुप्रीम कोर्टामध्ये रिटपिटीशन दाखल होऊ शकत. म्हणून आपण कोणताही पदावर असलो तर आपण कायद्याच्या कचाट्यातून सुटू असं कोणी समजू नये असं रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.