Supriya Sule reaction : संग्राम थोपटेंच्या पक्ष बदलण्याची चर्चा; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या 'ते सोबत राहतील...'

Sangram Thopte News : रविवारी भोरमध्ये ते कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. संग्राम थोपटे यांनी घेतलेल्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya sule, Sangaram thopte
Supriya sule, Sangaram thopte Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपच्या वाटेवरती आहेत. संग्राम थोपटे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ई-मेलद्वारे आपला राजीनामा पाठवला असल्याचा देखील समोर आले आहे. यानंतर आता रविवारी भोरमध्ये ते कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. संग्राम थोपटे यांनी घेतलेल्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भोर विधानसभा मतदारसंघ येतो. लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांच्या विजयामध्ये थोपटेंच्या भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा होता. संग्राम थोपटे यांनी भोरची खिंड लढवून तब्बल 42 हजाराचं लीड या ठिकाणाहून सुप्रिया सुळे यांना मिळून दिले होते. मात्र, त्यानंतर झालेला विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल वीस हजारांनी थोपटेंचा पराभव झाला. यामुळे थोपटे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर थोपटेनी हा राजीनामाच्या निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Supriya sule, Sangaram thopte
Sanjay Raut : महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाहीच..., संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

याबाबत पुण्यात माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) म्हणाल्या, "ही लोकशाही आहे. पण, थोपटेंच्या प्रवेशाबद्दलची माहिती माझ्यापर्यंत आली नाही. माझे आणि संग्राम थोपटेंचे सातत्याने बोलणे होते. पक्ष बदल करतोय, हे संग्राम थोपटेंनी मला सांगितले नाही. थोपटेंशी आमचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. लोकसभा आणि विधानसभेला आम्ही ताकदीने एकमेकांचे काम केले आहे."

Supriya sule, Sangaram thopte
Devendra Fadnavis : 'नाशिकमध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक दंगल घडवली', देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा कुणावर?

'संग्राम थोपटे (Sangram Thopte) महाविकास आघाडीसोबत राहतील, हा विश्वास आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखण्याची गरज नाही. संग्राम थोपटे हे अनुभवी नेते आहेत. ते तीनवेळा आमदार असताना उत्तम काम केले आहे,' असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

Supriya sule, Sangaram thopte
Pankaja Munde phone Call : मंत्री पंकजा मुंडेंचा शरद पवारांच्या खासदाराला काॅल; दोघांमध्ये काय ठरलं? ...तर सोनवणेंची राजीनाम्याची तयारी!

दरम्यान, थोपटे घराणे हे मुळचे काँग्रेसचे मानले जाते. संग्राम यांचे वडील अंनत थोपटे तब्बल सहा वेळा काँग्रेसकडून आमदार झाले होते. त्यांनी मंत्रिपद देखील भूषवले होते. त्यानंतर संग्राम थोपटे यांनी देखील सलग तीनवेळा भोर-मुळशी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Supriya sule, Sangaram thopte
Sangram Thopte News: मोठी बातमी! संग्राम थोपटेंनी दिला काँग्रेसचा राजीनामा; दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com