Sanjay Jagtap BJP entry : भाजप प्रवेश करताच काय मिळणार? संजय जगतापांनी केलीय 'बिगर हुंड्याची सोयरीक'

Sanjay Jagtap no dowry politics News : 16 जुलै रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sanjay Jagtap
Sanjay Jagtap sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार संजय जगताप यांनी सोमवारी सासवडमध्ये मेळावा घेत आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा केली. 16 जुलै रोजी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असून त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत आघाडीच्या राजकारणावर गंभीर आरोप केले आहेत.

सासवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय जगताप म्हणाले, 'मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर 16 जुलै रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्यांचे प्रश्न आणि पुरंदर हवेलीचा विकास अधिक गतीने व्हावा, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.'

Sanjay Jagtap
BJP Politics : भाजप अजूनही लोकसभेच्या धक्क्यात; सर्वात मोठ्या राज्यात सतावतोय विरोधकांचा तो ‘फॉर्म्यूला’

भाजपमध्ये प्रवेश करताना मला कोणतेही पद हवे आहे, याबाबत चर्चा झालेली नाही. त्या उलट पुरंदर विधानसभा मतदारसंघामधील विकास कामांसाठी भरीव निधी देण्याचा आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला मिळाले आहे.

Sanjay Jagtap
Congress internal conflict : काँग्रेसमध्ये गटबाजीचा स्फोट; दिल्ली दरबारी 'या' बड्या नेत्याची थेट तक्रार

1980 पासून माझे वडील हे काँग्रेसशी (Congress) संलग्न आहेत. पूर्वी काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्य दिसत होते. मात्र, काही काळापासून त्यामध्ये कमी पाहायला मिळत आहे. कुठल्याही संघटनेमध्ये संवाद महत्त्वाचा असतो, मात्र त्या संवादाची कमतरता कुठेतरी काँग्रेसमध्ये जाणवत आहे. त्यामुळे तुलनेने चांगली संघटन असलेल्या भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Sanjay Jagtap
BJP Politics : भाजप अजूनही लोकसभेच्या धक्क्यात; सर्वात मोठ्या राज्यात सतावतोय विरोधकांचा तो ‘फॉर्म्यूला’

भाजपमध्ये जाताना कोणताही वैयक्तिक अथवा पारिवारिक स्वार्थ माझा नाही. पक्ष प्रवेश करताना कोणतीही मागणी केली नसून जी भाजपसोबत सोयरीक ठरली आहे. ती बिगर हुंड्याची आहे. आगामी काळात भाजपकडून कोणतेही पद मी स्वीकारणार नसून थेट 2029 ची विधानसभा निवडणूक लढणार असल्याचा संजय जगताप यांनी सांगितले.

Sanjay Jagtap
Raj Thackeray Nashik : राज ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडलं 'लकी' नाशिक, ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता..

पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने विकास डावलण्यात आला आहे. आणि याला आघाडीचे राजकारण कारणीभूत राहिले आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये माझ्या पराभवाला देखील आघाडीचे राजकारण कारणीभूत ठरले असल्याचे संजय जगताप म्हणाले.

Sanjay Jagtap
Raj-Uddhav Thackeray Alliance : राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी 'मास्टर प्लॅन'! विधानसभेसाठी वापरलेला 'तो' डाव भाजप टाकणार!

लोकसभा निवडणुकीनंतर आघाडीमध्ये फक्त सत्तेचे राजकारण झाले आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीनंतर फक्त कोण मुख्यमंत्री होणार, कोण मंत्री कोण कोणाला काय मिळणार? याबाबत चर्चा करत राहिलो. बहुतेक जण फक्त वैयक्तिक सारख्याच याच गोष्टी करत होते. यामुळे आघाडीतील पक्षांमध्ये विसंवाद झाला आणि त्याचाच फटका विधानसभा निवडणुकीमध्ये बसला असल्याचे संजय जगताप यांनी सांगितले.

Sanjay Jagtap
Bacchu Kadu On Eknath Shinde : 'एकनाथ शिंदेंनी पक्ष घेऊन जायला नको होतं...', बच्चू कडू पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

भाजपमध्ये (BJP) पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोणत्याही वरिष्ठ पातळीवरील काँग्रेसच्या नेत्याने आपल्याला संपर्क साधून थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, असे देखील जगताप यांनी सांगितले. त्यामुळे भाजप प्रवेश कार्यक्रमादरम्यान ही काही खुलासे आपण करणार असल्याचे देखील जगताप म्हणाले.

Sanjay Jagtap
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : कडव्या डाव्यांच्या समर्थनासाठी विधेयक न वाचताच टीका; CM फडणवीसांनी ठाकरेंना फटकारलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com