Pradeep Kand News : कंद कुटुंबात पाचव्यांदा सरपंचपद....वडील, मुलांनंतर सुनांचीही लागली वर्णी!

Loni Kand Sarpanch : मोनिका कंद यांच्या नियुक्तीमुळे कंद कुटुंबात पाचव्यांदा सरपंचपद आले आहे. प्रदीप कंद यांच्या मातोश्री सुरेखा कंद यांनीही जिल्हा परिषदेचे सदस्यपदही भूषवले आहे.
pradeep kand-monika kand
pradeep kand-monika kandSarkarnama

Pune, 28 May : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे पूर्व हवेलीतील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे नेते. याच कंद कुटुंबीयांच्या घरात हवेली तालुक्यातील महत्वाचे गाव असलेल्या लोणीकंदचे सरपंचपद पाचव्यांदा आले आहे. प्रदीप कंद यांची भावजय मोनिका श्रीकांत कंद यांची बिनविरोध निवड झाली आहे.

यापूर्वीच्या सरपंच प्रियंका योगेश झुरुंगे यांनी 9 मे 2024 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लोणीकंदच्या सरपंचपदाची आज हवेलीच्या (Haveli) अतिरिक्त तहसीलदारांच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी (Sarpanch) मोनिका श्रीकांत कंद यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संदीप झिंगाटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

pradeep kand-monika kand
Pandharpur Politics : विधानसभेसाठी भगीरथ भालके पुन्हा स्वगृही येणार की काँग्रेसचा ‘हात’ हातात घेणार?

दरम्यान, कंद कुटुंबातील पाचवी व्यक्ती सरपंचपदी विराजमान झाली आहे. यापूर्वी लोणीकंदच्या सरपंचपदी विद्याधर कंद, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष राहिलेले प्रदीप कंद, त्यांच्या वहिनी अनिता दिलीप कंद तसेच बंधू श्रीकांत कंद व आता पुन्हा श्रीकांत कंद यांच्या पत्नी मोनिका श्रीकांत कंद यांची सरपंचपदी निवड झाली आहे. मोनिका कंद यांच्या नियुक्तीमुळे कंद कुटुंबात पाचव्यांदा सरपंचपद आले आहे. प्रदीप कंद यांच्या मातोश्री सुरेखा कंद यांनीही जिल्हा परिषदेचे सदस्यपदही भूषवले आहे.

लोणीकंद गावच्या राजकीय वाटचालीचा कंद कुटुंबीय हे आजवर केंद्रबिंदू राहिले आहे. या कंद कुटुंबात मोनिका कंद यांच्या रुपाने पाचव्यांदा सरपंचपद आले आहे. ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांच्या वतीने सरपंच मोनिका कंद यांचा सत्कार करण्यात आला.

वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन गावचा कारभार पाहणार आहे. नागरिकांना शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन, दर्जेदार रस्ते यांसह विविध विकास कामे करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे लोणीकंदचे नवनिर्वाचित सरपंच मोनिका श्रीकांत कंद यांनी स्पष्ट केले.

pradeep kand-monika kand
PM Narendra Modi News : प्रचाराचा झंझावात थांबताच मोदी करणार ध्यान; ‘या’ ठिकाणाची केली निवड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com