Hasan Mushrif : हसन मुश्रीफांपुढे रविंद्र धंगेकर व्यथित; नेमकं काय आहे प्रकरण?

Assembly Session Mla Ravindra Dhangekar : आमदार रवींद्र धंगेकर हे पावसाळी अधिवेशनात तमाम पुणेकरांना त्रासदायक ठरणारे प्रश्न आणि पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे विविध मुद्दे मांडून सरकारचे त्याकडे लक्ष वेधून घेत आहेत.
Hasan Mushrif- Ravindra Dhangekar
Hasan Mushrif- Ravindra DhangekarSarkarnama

Pune News : ससून रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नाहीत.त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. तर दुसरीकडे हे रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. येथे गुन्हेगारी कृत्य वाढत आहेत. या दोन्ही कारणांमुळे 'ससून'चा लौकीक खालावत आहे, अशी व्यथा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पावसाळी अधिवेशनात गुरुवारी मांडली. त्यावर राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले.

आमदार रवींद्र धंगेकर हे पावसाळी अधिवेशनात तमाम पुणेकरांना त्रासदायक ठरणारे प्रश्न आणि पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे विविध मुद्दे मांडून सरकारचे त्याकडे लक्ष वेधून घेत आहेत. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदार रवींद्र धंगेकर यांनी उचलून धरला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर देत हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन सभागृहाला दिले. त्यानंतर आता आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयातील दयनीय परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे.

Hasan Mushrif- Ravindra Dhangekar
Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरे गटात करणार प्रवेश ?

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, गेली 30 वर्षे आठवड्यातून दोन वेळा पुण्यातील ससून रुग्णालयात माझे येणे -जाणे आहे.पुण्यातील नामवंत हॉस्पिटलच्या बरोबरीने ससुन रुग्णालयाचे बजेट आहे.कोट्यवधी रुपयांचे बजेट असून देखील येथे रुग्णांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येत नाहीत.उपचारासाठी अद्ययावत यंत्र देण्यात आली. पण ती बंदच आहेत.ससूनमधील डॉक्टर हे अक्षरशः उपचारासाठी रुग्णांना पैसे मागत आहेत. पण त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. अमली पदार्थ प्रकरणात येथील तत्कालीन अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांचा सहभाग होता.

Hasan Mushrif- Ravindra Dhangekar
Dattatray Bharne: 'आमचं ठरत नसतं फिक्स असतं', दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील लढत अटळ?

या प्रकरणात त्यांची चौकशी झाली. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.उलट सोलापूर येथे अधिष्ठाता म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. पुणे शहराला आरोग्यप्रमुख नाही. त्यामुळे एकूणच ऐन पावसाळी दिवसात शहरातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.आमदार रवींद्र धंगेकर यांच्या निवेदनानंतर आता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उत्तर दिले आहे. ससूनमध्ये सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेवून प्रश्न निकाली काढू असे त्यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com