Pune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खुनानंतर पुण्यात खळबळ माजली. मोहोळच्या खुनाचा मुख्य कर्ताधर्ता साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकरने हा कट अत्यंत शिताफीने रचला होता. मागील काही काळापासून तो मोहोळचा खून करण्याची संधीची वाट पाहत होता. मोहोळ याच्या खुनाचा कट रचत असताना त्याच्या एका साथीदाराने नकार दिल्याने मुन्ना पोळेकरने भूगाव परिसरात त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात जखमी झालेल्या एका तरुणावर डॉक्टरांनी उपचार केले होते, मात्र पोलिसांनी याची माहिती उघड केली नव्हती. जर त्याचवेळी ही माहिती उजेडात आली असती, तर कदाचित शरद मोहोळ वाचला असता, अशी माहिती आता तपासात उघड झाली आहे. (Latest Marathi News)
एका तरुणावर गोळ्या झाडल्याबाबत पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बंडगार्डन पोलिसात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. आता या गुन्ह्याच्या तपासाचे काम ग्रामीण पोलिस विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची गुन्हे विभागाची तयारी सुरू आहे. 5 जानेवारी रोजी गुंड शरद मोहोळचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोळेकर याच्यासह दोन वकील असे एकूण 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुळशी तालुक्यात पोळेकरने शरद मोहोळच्या खुनाचा कट रचला होता. हा कट रचत असताना अजय नावाच्या एका तरुणाने या कटात सहभागी होण्यास पोळेकरला नकार दिला. तेव्हा पोळेकरने अजयवर गोळीबार केला असल्याची धक्कादायक माहिती आता उजेडात आली आहे.
अजयच्या पायावर गोळी लागल्याने तो दवाखान्यात उपचार घेण्यास दाखल झाला होता. उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला सोडून दिले. या प्रकरणाचा डॉक्टरांनी आणि पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. हे प्रकरण वेळीच पोलिसांना कळाले असते तर मोहोळ खून कटाचा पोलिसांना सुगावा लागून, कदाचित मोहोळ वाचला असता.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.