Pawar Vs Pawar : पवारांच्या बालेकिल्ल्यात इतर संघटनांचाही शड्डू; तावरेही मैदानात येणार?

Malegaon Sugar factory : बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या काही तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
Malegao Sugar Factory
Ajit Pawar, NCPSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या काही तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता असल्याने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात युगेंद्र पवार यांनीही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने या रणधुमाळीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

माळेगाव कारखाना म्हणजे अजित पवार यांचे राजकीय संस्थानचं!

माळेगाव आणि सोमेश्वर हे सहकारी तर अंबालिका आणि दौंड शुगर्स हे दोन खाजगी कारखाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नियंत्रणात आहेत. हे साखर कारखाने म्हणजे त्यांची राजकीय संस्थांनचं. आज घडीला हे चारही कारखाने उत्तम स्थितीमध्ये चालत आहेत. याचा साखर उतारा, इथेनॉलपासून निर्मिती, गाळप क्षमतेचा वापर अशा विविध कार्यक्षमतेवर हे कारखाने राज्यात अग्रगण्य ठरले आहेत.

Malegao Sugar Factory
Krishna Andhale : विकृतीचा कळस! कृष्णा आंधळेचे चार व्हिडिओ काॅल, संतोष देशमुखांची अवस्था दाखवत म्हणाला, 'सुदर्शनभैय्याला...'

माळेगाव हा शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना मानणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. 1997 आणि 2015 हे दोन अपवाद वगळता हा कारखाना पवार कुटुंबियांकडेच राहिला आहे. गतवेळी सहकारातील तज्ञ आणि भाजपचे माजी नेते चंद्रराव तावरे, कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे यांच्या हातातून अजित पवार यांनी हा कारखाना घेतला होता. आज घडीला माळेगाव कारखान्याचे 19 हजार 549 सभासद आहेत. बारामती तालुक्याच्या राजकारणात या कारखान्याला महत्त्वाचे स्थान आहे.

इतर संघटनांचा शड्डू :

माळेगावची निवडणूक ताकदीने लढवण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी केली होती. त्यानुसार ते ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, कष्टकरी शेतकरी समिती यांनी देखील निवडणूक लढण्याच्या तयारीने शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

Malegao Sugar Factory
Santosh Deshmukh Photos : जे फोटो पाहून महाराष्ट्र हादरला त्यावर संतोष देशमुखांच्या मुलीची काळीज पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया

अजित पवार आणि तावरे गुरू-शिष्य एकत्र येणार?

भाजपचे माजी नेते चंद्रराव तावरे, कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे हे गुरू-शिष्य पवार कुटुंबियांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. आता अजित पवार भाजपसोबत आहेत. त्यामुळे अजित पवार आणि तावरे एकत्र येणार अशी सभासदांमध्ये चर्चा आहे. पण तावरे यांचा पक्षविरहित निवडणुका लढल्याचा इतिहास असल्याने उत्सुकता कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com