Sharad Pawar News: बारामतीत पाडव्याचा सोहळा नाही; शरद पवार दिवाळीतच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर!

Sharad Pawar Diwali 2026 schedule : बारामतीतील दिवाळी पाडव्याचा पारंपरिक सोहळा यंदा होणार नाही. शरद पवार दिवाळीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबाची दिवाळी आणि बारामतीतील गोविंदबागेचा पाडवा हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून ठरलेले आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गोविंदबागेत गर्दी करतात.

मात्र, यंदा बारामतीत पवार कुटुंबाची दिवाळी साजरी होणार नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांनी हा भावनिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा गोविंदबागेतील पाडव्याचा पारंपरिक सोहळाही होणार नसल्याची माहिती आहे.

Sharad Pawar
Congress vs BJP protest in Delhi : काँग्रेसचा रामलीला मैदानावर ‘महामोर्चा’, तर प्रत्युत्तरासाठी भाजप सज्ज; 1 नोव्हेंबरला विरोध मार्च, दिल्लीत काय घडणार?

अजित पवार यांच्या निधनाला नऊ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, त्यांच्या जाण्याचे दुःख पवार कुटुंबीयांसाठी अद्यापही तितकेच मोठे आहे. दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला बारामतीतील गोविंदबागेत शरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक या दिवशी पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येतात. राजकीय घडामोडींच्या चर्चांमुळे या भेटीला विशेष महत्त्व असते. मात्र, यंदा या परंपरेला खंड पडणार आहे.

दरम्यान, दिवाळीचा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलेल्या शरद पवार यांनी दुसरीकडे राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून त्यांचा दुष्काळ दौरा सुरू होणार असून, पुढील तीन दिवसांत ते सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

Sharad Pawar
Congress vs BJP protest in Delhi : काँग्रेसचा रामलीला मैदानावर ‘महामोर्चा’, तर प्रत्युत्तरासाठी भाजप सज्ज; 1 नोव्हेंबरला विरोध मार्च, दिल्लीत काय घडणार?

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यावर या दौऱ्यात भर असणार आहे. त्यामुळे एका बाजूला अजित पवार यांच्या आठवणींनी पवार कुटुंबाची दिवाळी यंदा शांततेत जाणार असताना, दुसरीकडे शरद पवार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.