Sharad Pawar NCP : 'राष्ट्रवादी'च्या विलीकरणाबाबत संभ्रम, 'घड्याळा'वर निवडून आलेल्या शरद पवारांच्या नगरसेवक, झेडपी सदस्यांचे भवितव्य काय?

Sharad Pawar Ajit Pawar NCP : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. जे उमेदवार शरद पवारांच्या पक्षाचे होते मात्र, घड्याळ चिन्हावर लढले आणि विजयी झाले त्यांचे भवितव्य काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCPsarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अजित पवारांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार हे 'घड्याळ' चिन्हावर लढले.

शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढत असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकीनंतर एकत्र येणार, अशी चर्चा होती. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण 12 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते सांगतात. मात्र, निवडणुकीच्या दरम्यान, 28 जानेवारीला अजित पवारांचे विमान दुर्घटनेत निधन झाले.

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत संभ्रम दिसून येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती, असे सांगत आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते याबाबत थेट भूमिका घेताना दिसत नाही. सुनेत्रा पवार याबाबत निर्णय घेतील, असे सांगत आहेत.

विलीनीकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण असताना जे उमेदवार शरद पवारांच्या पक्षाचे होते. मात्र, घड्याळ चिन्हावर लढले आणि विजयी झाले त्यांचे भवितव्य काय अशी चर्चा सुरू झाली आहे. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे यावर चर्चा होत आहे.

राजकीय तज्ज्ञांच्या मते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची घड्याळ चिन्हावर लढले आहेत. त्यामुळे ते त्याच पक्षाचा भाग आहेत. जिल्हा परिषद किंवा महापालिकेत त्या पक्षाचे गटनेते जे व्हीप किंवा आदेश देतील तो त्यांना पाळणे बंधनकारक आहेत. कायदेशीर दृष्ट्‍या ते आता दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत.

Sharad Pawar NCP
Municipal elections Result : काँग्रेसच्या सुनामीत भाजपची वाताहात; विधानसभा निवडणुकांआधी बसला मोठा धक्का, फडणवीसांनीही केला होता प्रचार

विलीनीकरणाबाबत काय चर्चा?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका मांडताना म्हटले आहे की, त्यांच्याकडून विलीनकरणाचा प्रस्ताव आला की आम्ही चर्चा करू. तर, सूरज चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही आता अजितदादांच्या जाण्याने दुःखात आहोत. विलीकरणाबाबतचा निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील.

Sharad Pawar NCP
Sougata Roy Video : मोदीही दादा म्हणतात, त्या 78 वर्षीय नेत्याचा तरूण महिला खासदारासोबतचा लोकसभेतील व्हिडीओ होतोय व्हायरल...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com