Praveen Mane : इंदापूरच्या माने कुटुंबीयांस पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची ओढ; प्रवीण माने म्हणाले, ‘शरद पवार हे आमचे दैवत’

Indapur Politics : शरद पवार आणि माने कुटुंबीयांचे वेगळे नाते आहे. या विवाह सोहळ्याचे पवारांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीवर आत्ताच बोलणे, उचित होणार नाही, असेही प्रवीण माने यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar-Praveen Mane
Sharad Pawar-Praveen ManeSarkarnama
Published on
Updated on

Pune, 19 July : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील झालेले इंदापूरच्या माने कुटुंबीयांना शरद पवार गटात प्रवेश करण्याची आस लागल्याची चिन्हे दिसत आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी तसे विधानही केले आहे. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमचे कालही दैवत होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील’ असा दावा त्यांनी केला आहे, त्यामुळे माने कुटुंबीय लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाल्यास नवल वाटायला नको.

इंदापूर येथील पत्रकार परिषदेत प्रवीण माने (Praveen Mane) यांनी हे विधान केले आहे. सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सामुदायिक विवाह सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना आमंत्रित करण्यात आल्याचेही माने यांनी या वेळी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेत प्रवीण माने यांना ‘तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार का,’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी शरद पवार हे आमचे कालही दैवत होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. शरद पवार आणि माने कुटुंबीयांचे वेगळे नाते आहे. या विवाह सोहळ्याचे पवारांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे, असेही माने यांनी सांगितले.

विवाह सोहळा ही आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी तर नाही ना?, असा प्रश्न विचारला असता त्यांनी हा सामाजिक उपक्रम असून विधानसभा निवडणुकीवर आत्ताच बोलणे, उचित होणार नाही, असेही प्रवीण माने यांनी या वेळी म्हटले आहे.

Sharad Pawar-Praveen Mane
Solapur Bazar Samiti : मुख्यमंत्री शिंदेंची अजितदादा, फडणवीसांना धोबीपछाड; सोलापूर बाजार समितीवर समर्थकांची वर्णी

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी प्रवीण माने हे इंदापुरात स्वतः उपस्थित होते. तसेच, ते अजित पवार यांच्या स्टेजवरही उपस्थित होते. मात्र, इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांनाच मताधिक्य मिळाले आहे. सद्याचे राजकीय चित्र पाहता आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून प्रवीण माने हे आगामी काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतात, असे चर्चाही इंदापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Edited By : Vijay Dudhale

Sharad Pawar-Praveen Mane
Karmala Assembly Candidate : पवारांच्या राष्ट्रवादीचा करमाळा विधानसभेचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com