Praveen Mane News : प्रवीण माने करणार शरद पवार गटात घरवापसी? विधानसभा उमेदवारीचे संकेत

Political News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
Indapur News
Indapur NewsSarakrnama
Published on
Updated on

Indapur News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यात अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण-कोणत्या गटात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंदापूरच्या विद्यमान आमदारांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे ठरल्यानंतर उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

उद्या पक्ष ज्याला कोणाला विधानसभेचे तिकीट देईल, त्याचे काम करण्याची तयारी असल्याचे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी यांनी स्पष्ट करीत मानेंच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यामुळे प्रवीण माने हे शरद पवार गटात घरवापसी करतील, अशी चर्चा जोरात सुरु आहे.

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांच्यावर मोठा दबाव टाकला होता. त्यामुळे माने यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश केला होता, असा गौप्यस्फोट यावेळी महारुद्र पाटील यांनी केला आहे.

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय शिंदे, अमोल मुळे, किसन जावळे, समद सय्यद, प्रतीक काळे, विकास खिलारे, सचिन जगताप, सिकंदर बागवान आदी उपस्थित होते.

Indapur News
Congress News : काँग्रेस फुटीर आमदारांवर खरंच कारवाई करणार की पुन्हा अभय?

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, उद्या पक्ष ज्याला कोणाला विधानसभेचे तिकीट देईल, त्याचे काम करण्याची आमची तयारी आहे. प्रवीण माने यांच्या प्रश्नाबाबत बोलताना महारुद्र पाटील म्हणाले, प्रवीण माने यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात काम करायचे असते तर ते गाव भेट दौऱ्यात सहभागी झाले नसते.

लोकसभेच्या निवडणुकीवेळी सुप्रिया सुळेंसाठी प्रवीण मानेंनी इंदापूर तालुक्यातील साठ-सत्तर गावांमध्ये दौरा केला होता. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे म्हणत माने यांचे शरद पवार गटात घरवापसीचे संकेत त्यांनी दिले आहेत.

Indapur News
MVA News: महाविकास आघाडीची 'हा' मित्रपक्ष सोडणार साथ? विधानसभा स्वबळावर लढण्याची शक्यता

राज्यात इंदापूरची बदनामी

इंदापूरच्या विद्यमान आमदारांमुळे संपूर्ण राज्यात तालुक्याचे नाव बदनाम झाले आहे. पाहुण्यारावळ्यांकडे गेलो तरी लोक मलिदा गँगबद्दल विचारतात, असाही आरोप पाटील यांनी केला.

प्रवीण माने यांच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने हे गुरुवारी 18 जुलैला सकाळी 11 वाजता आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Indapur News
Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या; पुणे पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com