NCP SP Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी, पुण्यात गुप्त बैठक? फोटो आला समोर...

Sharad Pawar NCP Meeting : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची बैठक पुण्यात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत.
Senior leaders of Nationalist Congress Sharad pawar Party attend a key meeting in Pune under the leadership of Sharad Pawar.
Senior leaders of Nationalist Congress Sharad pawar Party attend a key meeting in Pune under the leadership of Sharad Pawar.sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहे. शरद पवार अ‍ॅक्शनमध्ये आले असून पक्षातील नेत्यांना त्यांना अ‍ॅक्टिव्ह केल्याची माहिती आहे. पक्षातील नेत्यांची नुकतीच पुण्यात बैठक झाल्याचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

या बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांचा फोटो देखील समोर आला आहे. मात्र, मात्र ही बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आले नाही.

नामांकित हॉटेलमध्ये ही बैठक पार पडलेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील,माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते अशी माहिती आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत.

शरद पवार हे पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी विविध राजकीय प्रश्नांची उत्तरे दिली होती. माजी मंत्री प्रफुल पटेलयांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळले आहे, त्याबाबत पवार म्हणाले, मला त्या गोष्टीवर भाष्य करायचे काही कारण नाही. तो दुसरा पक्ष आहे, त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे. मात्र, पटेल, तटकरेंमध्ये काय कर्तृत्व आहे, याची मला कल्पना आहे.

Senior leaders of Nationalist Congress Sharad pawar Party attend a key meeting in Pune under the leadership of Sharad Pawar.
NCP Politics : प्रफुल पटेल शरद पवारांना भेटले! तटकरेंच्या भेटीवेळी पटेलही...

प्रफुल पटेलांनी घेतली भेट?

शरद पवार यांची सुनील तटकरे यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीनंतर तटकरेंनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, तटकरे यांच्यासोबतच प्रफुल पटेल यांनी देखील भेट घेतल्याचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या आधारे दिले आहे.

Senior leaders of Nationalist Congress Sharad pawar Party attend a key meeting in Pune under the leadership of Sharad Pawar.
Shivsena UBT-NCP SP Setback : शरद पवारांना मोठा धक्का, ठाकरेंची साथही बड्या नेत्याने सोडली; शिंदेंच्या शिवसेनेला लाॅटरी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com