

Ncp News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची 12 मे रोजी सुनील तटकरे यांनी भेट घेतली होती. तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना वेळ घेत ही भेट घेतल्याचे सांगितले होते. तसेच याचा राजकीय अर्थ न काढण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, या भेटीनंतर आता प्रफुल पटेल हे देखील शरद पवारांना भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
12 मे रोजी सुनील तटकरे यांच्यसोबत प्रफुल पटेल हे देखील शरद पवारांना भेटले, असे साम टिव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जे निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. त्या पत्रामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
12 मे रोजी सुनील तटकरे हे शरद पवारांना भेटले होते. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले होते की, ही भेट शरद पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती असे सांगितले. आपण साहेबांची तब्येत ठीक नसल्याची माहिती मिळाल्यानंतर भेटीसाठी वेळ मागितली होती. साहेबांनी वेळ दिल्यानंतर भेटायला आलो.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची बैठक नुकतीच पुण्यात पार पडल्याचे समोर आले आहे.या बैठकीचा फोटो समोर आला असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते अशी माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.