Shivsena Maha Adhiveshan : कोल्हापूरच्या आखाड्यात श्रीकांत शिंदेंची हवाच हवा...

Dr. Shrikant Shinde Speech : मी कोणत्या शाळेत आणि कितव्या इयत्तेत शिकत आहे, हेही त्यांना माहिती नसायचं.
Dr. Shrikant Shinde
Dr. Shrikant Shinde Sarkarnama

Kolhapur News : शिंदेसाहेबांनी माझ्यासोबत एक क्षण घालवला आहे, अशी एकही आठवण मला लहानपणापासूनची आठवत नाही. त्यांनी कायम शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी वेळ दिला आहे. ते कायम जनतेची कामे करण्यातच मग्न असतात. आमच्यासाठी वेळ कधी देणार, अशी आमची त्यांच्याकडे सतत तक्रार असायची. या तक्रारीचे उत्तर त्यांच्याकडे कधीही नसायचे. पण, मला माझ्या बापाचा अभिमान आहे, असे सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अश्रू अनावर झाले. (Shiv Sena convention)

कोल्हापूर येथे शिवसेनेचे महाअधिवेशन शुक्रवारपासून (ता. १६ फेब्रुवारी) सुरू आहे. त्या अधिवेशनात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली. त्यांच्या रोखठोक आणि परखड भाषणाने अनेकांची बोलती बंद करून टाकली, पण परखड बोलतानाच डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांची नवी ओळखच जगासमोर आणली. आपल्या भाषणात डॉ. श्रीकांत शिंदे अनेकदा भावूक झाले. अधिवेशनाला उपस्थित असलेले आमदार, खासदार आणि शिवसेना पदाधिकारीही या वेळी भावूक झाले होते. या अधिवेशनात श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाची हवा दिसून आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात काही कौटुंबिक किस्सेही सांगितले, ते शिवसैनिकांना भावनिक करून गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच आपले कुटुंब मानून काम केले आहे. शिवसेना हेच आपले कुटुंब मानलेला एक साधा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला, असा विश्वास एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वांचा आहे. त्यांनी कधीही माझं कुटुंब-माझी जबाबदारी असं मानलं नाही. एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्र, शिवसैनिक हेच माझं कुटुंब आहे, असे मानून काम केले आहे, असे डॉ. श्रीकांत यांनी नमूद केले. (MP Shrikant Shinde News)

कुटुंबाला देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसायचा. मी कोणत्या शाळेत आणि कितव्या इयत्तेत शिकत आहे, हेही त्यांना माहिती नसायचं. मी पास होतो की नापास यापासून ते कोसो दूर असायचे. त्यांनी फक्त महाराष्ट्र आणि शिवसैनिकांची काळजी घेतली. आम्हाला कधी वेळ देणार, या तक्रारीचं उत्तर त्यांच्याकडे नसायचं, हे सांगताना श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्यांतून आश्रू आले. (Marathi Political News)

आम्ही जेव्हा एखादा कौटुंबिक कार्यक्रम अथवा नेत्यांच्या मुलाखतींच्या कार्यक्रमात जातो, तेव्हा मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो. एकनाथ शिंदे यांच्यासोबतची एक आठवण सांगा, पण मी एकनाथ शिंदे यांना केवळ शिवसैनिकांमध्ये पाहिले आहे. लहानपणापासून आजपर्यंतची मला एकही आठवण आठवत नाही, शिंदेसाहेब यांनी माझ्यासोबत एक क्षण घालवला. आम्ही सतत त्यांच्याकडे तक्रार करायचो. आम्हाला वेळ कधी देणार, पण या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसायचे. त्यांनी कायम जनतेला वेळ दिला. पण, मला माझ्या बापाचा अभिमान आहे, असे सांगताना श्रीकांत शिंदे यांचे डोळे पाणावले होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com