Sharad Pawar: माळेगाव निवडणुकीच्या निकालादिवशीच शरद पवारांचं अजितदादांबाबत मोठं विधान; म्हणाले, 'सत्तेतील लोकांनी...'

Malegaon Sugar Factory Election : शरद पवार यांनी अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या भूमिकेवर रोखठोक मत व्यक्त केलंय. सत्तेतील लोकांनी साखर कारखान्याची निवडणूक का लढू नये, याविषयीचं स्पष्टीकरणही दिलंय.
Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Goverment: बारामतीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी चार पॅनेल मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांचं ‘बळीराजा पॅनेल’, अजित पवारांचं ‘निळकंठेश्वर पॅनेल’, शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचे ‘सहकार बचाव पॅनेल’ आणि शेतकरी संघटनांचे पॅनेल मैदानात उतरलं आहे. आता या निवडणुकीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे.

बारामती तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिष्ठापणाला लावलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता.24 जून) सकाळी नऊ वाजल्यापासून केली जात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारचं या निवडणुकीत मैदानात उतरल्यानं संपूर्ण राज्याचेच लक्ष या निकालाकडे लागले आहे.

याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार शरद पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. या निवडणुकीवर बोलताना पवार म्हणाले, गेल्या 40 वर्षांपासून माळेगाव कारखाना माझ्या विचारांवर चालत होता. पण सत्तेतील लोकांनीच कारखान्याची निवडणूक लढवणं योग्य नसल्याचं विधान करत शरद पवार यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला आहे.

शरद पवार यांनी अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या भूमिकेवर रोखठोक मत व्यक्त केलंय.सत्तेतील लोकांनी साखर कारखान्याची निवडणूक का लढू नये याविषयीचं स्पष्टीकरणही दिलंय.

Sharad Pawar-Ajit Pawar
Air Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मोठी अपडेट,केंद्रीय मंत्र्यांची 'ब्लॅक बॉक्स'बाबत पुण्यात महत्त्वाची माहिती

पवार म्हणाले,कारण सत्तेत बसलेली व्यक्ती कारखान्यावर असेल तर कारखान्यातील विरोधी गटाने एखादा मुद्दा उपस्थित केला तर कारखान्यातील सत्तेतील लोकं त्यांना न्याय देऊ शकत नाही,असंही पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार म्हणाले,हिंदी भाषा पहिली ते पाचवीपर्यंत सक्तीची करणं योग्य नाहीच. पण हिंदी भाषेला कमी लेखणं देखील बरोबर नाही. देशात 55 टक्के जनता हिंदी भाषिक आहे. त्यामुळे व्यवहार करता आला पाहिजे,असंही यावेळी पवार यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून राजकीय घमासान सुरू आहे. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी आक्रमक राजकीय भूमिका घेत वातावरण तापवलं आहे. महायुती सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. अशातच शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्ती करणे हे योग्य नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar-Ajit Pawar
Bhaskar Jadhav : मातोश्रीवर ताटकळत ठेवलं, ठाकरेंनी डावललं... खचलेल्या 'भास्कररावांना' शरद पवारांनी तारलं

पण या भाषेला कमी लेखणं बरोबर नाही आहे.कारण देशात 55 टक्के लोक हे हिंदी भाषा बोलणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार करता येणं गरजेच असल्याचं मतही पवारांनी व्यक्त केलं आहे. तसेच हिंदी भाषेला महत्व देणंही तितकंच गरजेचं असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com