
Pune News : अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 270 लोकांचा मृत्यू झाला होता. अहमदाबाद विमानतळावरून (Ahmedabad Plane Crash) लंडनला जाणारे हे विमान एआय-171 टेकऑफ घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. कोसळलेले हे विमान मेडिकल कॉलेज हॉस्टेलला धडकले होते. त्यामुळे या अपघातात प्रवाशांसह एकूण 270 जणांचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात मोठी माहिती दिली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी मंगळवारी (ता.24) पुण्यात आयोजित केलेल्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट समिट या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित होते.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेच्याबाबत मोठी माहिती आता समोर आली आहे. एअर इंडिया विमानाचा "ब्लॅक बॉक्स" भारतातच असून अहमदाबाद दुर्घटनेतील "ब्लॅक बॉक्स" तपासणीसाठी भारताबाहेर पाठवलेला नाही. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो यांच्याकडून ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांनी दिली.
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेबाबत विमानातील ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला आहे का असा प्रश्न केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी "ब्लॅक बॉक्स" भारतातच असून एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो यांच्याकडून ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे आणि आम्ही तो बाहेर पाठवणार नाहीत ती फक्त माध्यमांत चर्चा आहे, वस्तुस्थिती तशी नाही असं नायडू म्हणाले.
नायडू यांनी चार धाममधील होणाऱ्या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या बाबत सुद्धा भाष्य केलं. केदारनाथ, बद्रीनाथ येथील अपघातांवर नायडू म्हणाले, हेलिकॉप्टरच्या होत असलेल्या अपघाताबाबत जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व दिलं आहे त्यात कुठली ही तडजोड केली जाणार नाही. सुरक्षितता अधिक मजबूत करणे तसेच निरीक्षण वाढवणे यावर भर दिला जात आहे.
डोंगराळ भागात लवकरच एयर ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट केला जाईल. अनेकवेळा अशा भागांमध्ये हवामान अचानक बदलले जाते. ज्यामुळे अपघात घडतात. त्यासाठी हवामान डेटा ऑब्जर्वेशन केला जाईल.
येत्या सप्टेंबरपर्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून येत्या 2 ते 3 महिन्यांत ती सेवा सुधारल्या जातील. काही दिवसांपूर्वी केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये हेलिकॉप्टर चे अपघात झाले ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.