Sharad Pawar–Parth Pawar : शरद पवार-पार्थ पवारांचा फोटो तुफान व्हायरल; रोहित पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Sharad Pawar–Parth Pawar Photo : सहयोग सोसायटीमध्ये शरद पार्थ पवारांना सल्ला देत असतानाचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमागील स्टोरी रोहित पवारांनी सांगितली आहे.
Sharad Pawar–Parth Pawar Viral Photo
Sharad Pawar–Parth Pawar Viral Photosarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय एकमेकांचा आधार होताना दिसत आहेत. शरद पवार दोन वेळा अजित पवारांचे निवास्थान असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये गेले. तेथे त्यांनी सात्वंन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून येणाऱ्या पदाधिकारी, नेत्यांची भेट घेतली.

दरम्यान, रोहित पवार, पार्थ पवार आणि शरद पवार एकत्र असताना शरद पवार हे पार्थ पवारांना काही तरी सांगत असलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पोरं घडवण्यासाठी वस्ताद मैदानात उतरला, आधारवड,पालवीला मुळांचा आधार असे कॅप्शन देत हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

शनिवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडले. पिंपळी येथील मतदान केंद्रावर रोहित पवार यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शरद पवार हे काय सल्ला देत होते ते सांगितले.

ते म्हणाले, काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं. येणाऱ्या काळात काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. राजकीय नाही, दादांच्या स्मरणार्थ कशा करता येतील, कशा पद्धतीने त्या केल्या पाहिजेत, या संदर्भातील चर्चा जो तुम्ही फोटो पाहत आहेत

Sharad Pawar–Parth Pawar Viral Photo
IAS Suspends : दोन IAS अधिकारी सस्पेंड, दोन सचिवांची बदली; मुख्यमंत्री 'अ‍ॅक्शन मोडवर'!

अजितदांची शेवटची इच्छा पूर्ण होणार

रोहित पवार म्हणाले, 'जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जास्तीत जास्त कार्यकर्ते विजयी व्हावेत हे त्यांचे अंतिम स्वप्न होतं. दादांचे शेवटचे स्वप्न नक्की पूर्ण होईल. त्यांचे कार्यकर्ते निवडून येतील.',

Sharad Pawar–Parth Pawar Viral Photo
Sunil Tatkare : सुनील तटकरेंचे सूर बदलले, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाले, 'एकत्र...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com