IAS Suspends : दोन IAS अधिकारी सस्पेंड, दोन सचिवांची बदली; मुख्यमंत्री 'अ‍ॅक्शन मोडवर'!

IAS Transfers Secretari Transfers Panjab : कोर्टात नामुष्की सहन करावा लागल्याने दोन वरिष्ठ आएसएस अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले आहे. तर, दोन सचिवांची बदली करण्यात आली.
 Suspended
Suspendedsarkarnama
Published on
Updated on

Bhagwant Mann News : आयएएस अधिकारी हे प्रशासनाचा कणा असतात. त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यांमुळे नेते मंडळींमध्ये देखील त्यांचा वचक असतो. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार देखील दोनदा विचार करत असते. मात्र, कोर्टात नामुष्की सहन करावी लागल्यानंतर पंजाबमधील दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले आहे.

पंजबाचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी वरिष्ठ दोन आयएएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केले आहे. तर, अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिव यांच्या बदल्या केल्या आहेत.

सस्पेंड करण्यात आलेल्या IAS अधिकाऱ्यांचे नाव कमल किशोर यादव आणि जसप्रतीस सिंह आहे. यादव हे उद्योग आणि वाणिज्य विभागाचे सचिव होते. तर सिंह यांच्याकडे पंजाब सरकारच्या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर पद होते.

सरकारने अंगणवाडी सेवक आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल देण्यासंदर्भात योजना सुरु केली होती. मात्र, खासगी कंपनीने कोर्टात जात सरकारच्या या निर्णयावर स्टे आणला. कोर्टाने सरकराला खडे बोल सुनावले. त्यामुळे जबाबदारी निश्चिक करण्यासाठी पंजाब सरकारने तातडीने दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड केले तर दोन सचिवांच्या बदली केली.

 Suspended
Sharad Pawar Rajya Sabha : शरद पवार राज्यसभा लढवणार? राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले, 'मुळात असं आहे की...'

चंदीगड मुख्यालयात थांबण्याचे आदेश

सस्पेंड करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना चंदीगडमधील राज्य मुख्यालयात तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विना परवानगी त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. या दरम्यान त्यांना केवळ निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, ही कारवाई पूर्णपणे प्रशासकीय आधारावर करण्यात आली आहे.

 Suspended
Kolhapur ZP Election : बॅलेट पेपरवर निवडणूक का नाही? प्रश्न विचारत ठाकरेंच्या शिवसैनिकाने जागेवर EVM फोडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com