Pimpri Chinchwad Politics : दिलीप वळसेंच्या 'आदिवासी व्होट बँकेवर' शरद पवारांचा हातोडा; काय आहे राजकीय गणित ?

Sharad Pawar In Junnar Tour : जुन्नर आणि आंबेगावला आदिवासी मतांची निर्णायकी भूमिका बजावतात.
Pimpri Chinchwad Politics Sharad Pawar Ajit Pawar
Pimpri Chinchwad Politics Sharad Pawar Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : बिरसा ब्रिगेडच्या राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जुन्नरला (जि. पुणे) दौऱ्यावरती आले आहेत. वरकरणी हा कार्यक्रम अराजकीय असला, तरी त्यातून अजित पवार गटाबरोबर गेलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांची व्होट बँक असलेल्या आदिवासी मतांवर शरद पवार हातोडा मारणार आहेत. अजित पवारांबरोबर गेलेल्या व तटस्थ राहिलेल्या आमदारांनाही या दौऱ्यातून ते कडक इशारा भेटीगाठीतून देण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सह्याद्रीच्या डोंगररांगातील आदिवासी मते ही पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील जुन्नर,आंबेगाव, खेडसह मावळ या विधानसभा मतदारसंघात आहेत. जुन्नर आणि आंबेगावला ती काहीशी निर्णायकी भूमिका बजावतात. खेड आणि मावळच्या विजयात त्यांचा वाटा असतो. त्यामुळे तेथील आमदार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत नाहीत. म्हणूनच तटस्थ राहूनही जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके हे या परिषदेच्या तयारीची जबाबदारी उचलत आहेत.

Pimpri Chinchwad Politics Sharad Pawar Ajit Pawar
Nanded NCP Politics : आधीच परिस्थिती बिकट, त्यात राष्ट्रवादीवर पक्षफुटीचा आघात...

अजित पवारांची साथ दिलेले खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही तिथे हजेरी लावलीच नाही, तर भाषणही केले. तर अजितदादांबरोबर गेलेले मावळचे आमदार सुनील शेळके यांचा कार्यकर्ता देवा गायकवाड याने मावळातील आदिवासींना जुन्नर येथे जाण्यासाठी मोफत वाहनव्यवस्था केली. या वेळी शेळकेंनी उपस्थिती लावून मनोगतही व्यक्त केले.

राष्ट्रवादीतील कथित फुटीनंतर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असे दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांबरोबर गेले आहेत. त्याचा मोठा धक्का शरद पवारांना बसला. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी ते आंबेगावातच पहिली जाहीर सभा घेणार होते, पण ती झाली नाही. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या अजितदादांबरोबर गेलेल्या दोन नेत्यांच्या येवला आणि बीड मतदारसंघात ती त्यांनी घेतली.

Pimpri Chinchwad Politics Sharad Pawar Ajit Pawar
Shirur News : भाजप लागली शिरूरमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही तयारीला : 'या' नेत्यांवर विशेष जबाबदारी

दिवाळीनंतर ते आंबेगाव आणि शिरूरमध्ये ती घेणार आहेत. पण त्यापूर्वीच वळसे यांची व्होटबँक असलेल्या आदिवासी मतांवर ते आज कुऱ्हाड चालविणार आहेत. गतवर्षीही ते आदिवासी चौथरा तथा काळा चबुतरा अभिवादन दिनानिमित्त बिरसा ब्रिगेडने आयोजित या परिषदेला जुन्नरला आले होते. या वेळी मात्र राजकीय सत्तापालट होऊन समीकरण बदलल्यानंतर ते पुन्हा येत आहेत. त्यामुळे ते काय बोलतात, याकडे उत्तर पुणे जिल्ह्याचेच नाही, तर राज्यातील आदिवासींचेही लक्ष लागले आहे.

दरम्यान, परिषद सुरू होताच खेडचे आमदार मोहिते यांनी भाषण करून शरद पवार येण्यापूर्वीच काढता पाय घेतला. सकाळी आळंदीतील मंदिर सभामंडपाच्या पायाभरणीच्या त्यांच्या मतदारसंघातील व नंतर भोसरी मतदारसंघातील चऱ्होली येथील वारकरी संमेलनालाही ते उपस्थित नव्हते. भोसरीचे स्थानिक आमदार महेश लांडगे हेही चऱ्होलीच्या वारकरी संमेलनाला हजर नव्हते.

Pimpri Chinchwad Politics Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Shirur Tour : शरद पवारांनी घातलं शिरूरमध्ये लक्ष; आजी-माजी आमदारांच्या भेटीगाठी!

२०१९ ला शरद पवार हे जुन्नरला बेनके यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यानंतर ते कुठल्याच राजकीय कार्यक्रमाला जुन्नरला गेलेले नाहीत. गेल्या वर्षी व यावर्षी ते आदिवासींच्या या परिषदेला मात्र आवर्जून हजेरी लावत आहेत. फरक इतकाच की, गेल्या वर्षी दिलीप वळसे हे या परिषदेला हजर होते. या वेळी मात्र ते नसणार आहेत. तटस्थ स्थानिक आमदार बेनकेंचे कान शरद पवार आज टोचणार का, याकडेही राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com