Shirur Exit Poll: अमोल कोल्हे अजितदादांचं आव्हान मोडीत काढणार; आढळरावांची शिकार करणार ?

Amol Kolhe Vs Shivajirao Aadhalrao Patil 2024 : लोकसभेच्या निवडणुकीत शिरूरचा किल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजितदादा पवार यांनी खेळी केली होती.
Shivajirao Adhalrao Patil-Amol Kolhe
Shivajirao Adhalrao Patil-Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Shirur Lok Sabha News : ज्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमोल कोल्हेंना शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं, तिकीटही मिळवून देत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडूनही आणले. पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्याच अजित पवारांनी 'तू यंदा खासदारच कसा होतो तेच पाहतो' असं आव्हान दिले होते.त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं.

पण ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवारांनी पूर्ण ताकद पणाला लावली अन् कोल्हेंनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराची 'कमान' सांभाळत मतदासरसंघही पिंजून काढला. मता-मतांचा हिशेब जुळवला.

लोकसभेच्या निवडणुकीत शिरूरचा किल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याकडून पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजितदादा पवार यांनी खेळी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिलेदार आणि ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्याकडे ओढले. डॉ. कोल्हे यांच्या विरोधात आढळराव यांना उमेदवारी देत अजितदादांनी खासदार कोल्हे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले.

आता तेच कोल्हे अजित पवारांचं आव्हान मोडीत काढण्याची चिन्हे असून शिरूरचा गड पुन्हा एकदा कायम राखणार असल्याचे दिसून येत आहे. तर सलग दुसर्‍यांदा शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी (Shivajirao Aadhalao Patil) पराभवाचा धक्का बसणार असल्याची शक्यता एक्झिट पोलमधून पुढे येत आहे.

एकदा आव्हान दिलं की ते पूर्णच करण्यासाठी अजित पवार ओळखले जातात.म्हणून भलेभले त्यांच्याशी पंगा घेण्याआधी दहावेळा विचार करतात.पण त्याच अजितदादांना शिवसेना शिंदे गटातून शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या पराभवासाठी एवढे वाजत गाजत आणलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदारकीची वाट खडतर असल्याची शक्यता एक्झिट पोलमधून समोर येत आहे.

Shivajirao Adhalrao Patil-Amol Kolhe
Bhiwandi Lok Sabha Exit Poll : दिल्लीला निघालेल्या 'बाळ्यामामा'ची धाव भिवंडीतच!

'टीव्ही ९ पोलस्ट्राट'च्या अहवालानुसार, शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Shivajirao Adhalrao Patil-Amol Kolhe
Vidarbha Exit Poll: विदर्भातून कोणाची 'एक्झिट' होणार; महायुती की महाविकास आघाडी? नाराजी भोवणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com