Shirur Kharedi-Vikri Sangh Election : बिनविरोधमध्ये अजितदादांच्या आमदाराची सरशी, तर निवडणुकीत अशोक पवारांची बाजी; पण नाट्यमय घडामोडीची शक्यता

Ashok Pawar Vs Dnyneshwar Katke : सद्यस्थितीत खरेदी विक्री संघावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसत असले तरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीपर्यंत अनेक धक्कादायक घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे शिरूर खरेदी विक्री संघावर कोण बाजी मारेल, हे मात्र अनिश्चित आहे.
Ashok Pawar - Dnyneshwar Katke
Ashok Pawar - Dnyneshwar KatkeSarkarnama
Published on
Updated on

Shirur, 10 March : शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला ‘कभी खुशी कभी गम’ चा अनुभव आला आहे. संघाच्या १७ पैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या, त्यातील दहा जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या समर्थकांना मिळाल्या होत्या. संघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार ॲड अशोक पवार यांनी बाजी मारली आहे. सद्यस्थितीत खरेदी विक्री संघावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसत असले तरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीपर्यंत अनेक धक्कादायक घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे शिरूर खरेदी विक्री संघावर कोण बाजी मारेल, हे मात्र अनिश्चित आहे.

बिनविरोध निवडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार ज्ञानेश्वर कटके (Dnyneshwar Katke) यांच्या गटाला दहा जागा मिळाल्या हेात्या, तर दोन जागा ह्या माजी आमदार अशोक पवार यांच्या गटाला मिळाल्या होत्या. याशिवाय संघाच्या पाच जागांच्या निवडणुकीत सर्व पाचही जागा जिंकण्याचा पराक्रम अशोक पवार गटाने केला आहे, त्यामुळे शिरूर खरेदी-विक्री संघात सध्या अशोक पवार गटाकडे सात, तर आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे दहा जागा आहेत.

शिरूर खरेदी-विक्री संघाच्या (Shirur Kharedi-Vikri Sangh) रांजणगाव गटातून विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नरवडे, कारेगाव गटातून राहुल गवारे, न्हावरे गटातून नामदेव गिरमकर, पाबळ गटातून लहूजी थोरात, तळेगाव ढमढेरे गटातून गुलाब सातपुते, शिक्रापूर गटातून बाळासाहेब टेमगिरे, धामारी गटातून कानिफनाथ भरणे, तर अनुसूचित जाती जमाती गटातून विवेक सोनवणे, महिला प्रतिनिधी मनीषा शेलार आणि सुजाता नरवडे, इतर मागास प्रवर्गातून संभाजी भुजबळ व भटक्या विमुक्त जाती गटातून शरद कालेवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान, बिनविरोध निवडून आलेले बारापैकी दहा संचालक आमच्या गटाचे असल्याचा दावा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी केला आहे. त्यांचा आमदार कटके यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरणे गळ्यात घालून सत्कारही करण्यात आला आहे. उर्वरीत दोन संचालक हे माजी आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्याकडे असल्याचे सांगितले गेले.

Ashok Pawar - Dnyneshwar Katke
Walmik Karad : ‘त्या’ वादात एक गोळी पायाला लागली अन्‌ वाल्मीक कराड हा घरगड्याचा मालक झाला!

शिरूर खरेदी-विक्री संघाच्या उर्वरीत पाच जागांसाठी निवडणूक झाली. त्यात सोसायटी मतदार संघाच्या टाकळी हाजी गटातून महेंद्र सुरेश पाचर्णे हे २८ पैकी तब्बल १९ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांचे विरोधक प्रमोद दंडवते यांना केवळ नऊ मते मिळाली आहेत. माजी आमदार अशोक पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या मांडवगण फराटा व वडगाव रासाई गटातही मोठी चुरस दिसून आली. तेथील उमेदवार केवळ एका मताने निवडून आले.

संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नागवडे हे मांडवगण गटातून विजयी झाले आहेत, त्यांना १४ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश साळुंके यांना १३ मते मिळाली आहेत. सुरेशचंद्र ढवळे यांना वडगाव गटातून ११ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शरद साठे यांना दहा मते मिळाली. संघाचे विद्यमान संचालक सर्जेराव दसगुडे हे सर्वाधिक ११३१ मते मिळवून, तर नवनाथ ढमढेरे हे १११५ मते घेऊन वैयक्तिक सभासद मतदार संघाच्या दोन जागांवर निवडून आले. नितीन थोरात यांना पराभव पत्करावा लागला, त्यांना केवळ २२१ मते मिळाली आहेत.

Ashok Pawar - Dnyneshwar Katke
Solapur Shivsena UBT : ठाकरेंकडून तिसऱ्याच दिवशी डॅमेज कंट्रोल; शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुखपदाची धुरा पुन्हा तरुण शिवसैनिकाच्या खांद्यावर

निवडणूक झालेल्या संघाच्या पाचही जागांवर माजी आमदार अशोक पवार यांच्या समर्थकांची वर्णी लागली आहे. सद्यस्थितीत संघात दहा-सात असे बलाबल आहे. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र, खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपर्यंत अनेक घडामोडी आणि राजकीय नाट्ये घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजी-माजी आमदारांसह अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संचालकांना ‘जागते रहो’च्या भूमिकेत राहावे लागणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com