
Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे मताधिक्य दिसताना विधानसभा निवडणुकीत सोयीस्कर भूमिका घेऊन माजी आमदार के. पी. पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवली. राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर (Prakash Aabitkar) यांच्याविरोधात माजी आमदार के. पी. पाटील यांनी मैदानात शड्डू ठोकला होता. या निवडणुकीत पाटलांच्या पदरी अपयश आलं. याउलट आबिटकरांना थेट मंत्रिपद मिळालं. यामुळे पाटलांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे.
राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात नामुष्कीजनक पराभव झाल्यानंतर माजी आमदार के पी पाटील यांनी पुन्हा एकदा सोयीस्कर भूमिका घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची भेट घेतली आहे. यांच्या भेटीने मात्र जिल्ह्यात अनेक तर्क-वितर्क लढवले जात असून पाटील यांच्या राजकीय निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
कोल्हापुरातील ठाकरे गटाचे नेते के. पी. पाटील यांची पुन्हा कोलांटी उडी घेण्याचा प्रयत्न करत माजी आमदार पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांचा पाटील यांनी घरी येऊन सत्कार केला. के. पी. पाटील यांनी ठाकरे गटाकडून राधानगरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी के. पी. पाटील यांचा पराभव केला होता. पण मुश्रीफ यांची भेट घेतल्याने निवडणुकी आदी महाविकास आघाडीत गेलेले पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय पाटलांच्या चांगलाच अंगलट आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार के पी पाटील हे महायुतीमध्ये होते. लोकसभा निवडणुकीत महायुती सोबत खांद्याला खांदा लावून प्रचार केला. महायुतीचे उमेदवार माजी खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात आघाडी घेतली. मात्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे मताधिक्य पाहून महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला.
आपण कधीही शरद पवार यांची साथ सोडली नाही असे विधान करून अनेकांच्या भाऊ या उंचावल्या. ठाकरेंच्या शिवसेनेत जाऊन उमेदवारी मिळवली केवळ अडीच महिन्यांत महायुती मधील राष्ट्रवादी त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना असा महिनाभरात तीन पक्षांचा प्रवास करून त्यांनी उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.