MP Amol Kolhe On Dilip Mohite : कोल्हेंचा मोहितेंना सवाल, 'चहाचं सोडा दुधाचं काय ते बोला'!

Shirur Lok Sabha Constituency : भाजपने शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली
Dilip Mohite Amol Kolhe
Dilip Mohite Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Shirur News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर निशाणा साधला होता. मागच्या वेळी डॉ. अमोल कोल्हे यांना खासदार करण्यासाठी जिवाचं रान केलं. त्यांना निवडूनही आणलं. पण मला त्यांनी चहासुद्धा पाजला नाही, असा टोमणा मोहिते यांनी मारला होता. त्याला आता खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले आहे.

बलिदान दिनानिमित्त खासदार कोल्हे आज वढू बुद्रुक येथे आले असता, त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला, खासदार कोल्हे म्हणाले, वढू बुद्रुकचे स्मारक राष्ट्रीय स्मारक व्हावे, या उदयनराजेंच्या मागणीला माझे अनुमोदन आहे. समाधी स्थळाच्या भूमिपूजनासाठी महायुतीचे जे कोणी नेते स्टेजवर मिरवत होते, त्यातील एकही नेता येथे वढू बुद्रुकला नतमस्तक होण्यासाठी आज आला नाही. फ्लेक्सवर तर नाहीच पण त्यांच्या हृदयातही संभाजीराजे नाहीत. त्यांना इथे नतमस्तक होण्यासाठी वेळ नाही, अशी टीका कोल्हे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dilip Mohite Amol Kolhe
Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातील इच्छुक थेट पवारांनाच म्हणाला, 'कुणी उमेदवार भेटतोय का नाही, तर मी आहेच'

खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी खासदार कोल्हे यांनी चहादेखील पाजला नाही, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना कोल्हे म्हणाले, आमदार मोहितेंच्या व्यक्तिगत टीकांना उत्तर देणे महत्त्वाचे नाही. चहा पाजला की नाही, यापेक्षा मतदारसंघात किती प्रकल्प मला आणता आले हे महत्त्वाचे आहे. तसेच मी कोणाला चहा पाजला की नाही, यापेक्षा मला कांद्याचे बाजारभाव महत्त्वाचे आहेत. भाजपने (BJP) शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली आहे, अशी टीका त्यांनी केली.

महायुतीतील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीही आवाज उठवला नाही. कांद्यावर आवाज उठवत नाही मग हे महायुतीचे खासदार मत कसे मागणार? असा सवाल करत कोणाला चहा पाजला की नाही, पाजला त्यापेक्षा दुधाचे (Milk) बाजारभाव दिले का नाही? हे माझ्यासाठी महत्त्वाचा असून, आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दुधाच्या भावावरती बोलावं, या शब्दात कोल्हे यांनी मोहिते यांच्या टीकेला उत्तर दिलं.

Dilip Mohite Amol Kolhe
Jitendra Awhad News : 'भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देत भाजपचा भ्रष्टाचार' जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर घणाघात

शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नेते अतुल देशमुख भाजपमधून बाहेर पडले असल्याचं समजलं. मात्र, त्यांनी अद्याप माझ्याशी संपर्क केलेला नाही, असं सांगत "ये तो सिर्फ ट्रेलर है" असा सूचक इशारा कोल्हे यांनी दिला. राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरदेखील खासदार कोल्हे यांनी भाष्य केलं ते म्हणाले, राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नाकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अजित पवार हे विकासावर बोलतात, पण पाणीटंचाईवर बैठक घेताना दिसत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना वेळ नाही ते जागावाटपासाठी दिल्ली वारी करण्यात बिझी आहेत.

Edited by: Chaitanya Machale

R

Dilip Mohite Amol Kolhe
Lok Sabha Pimpri : 'चार सौ पार'साठी बंद भोंगा सुरू करण्याचे काम चाललंय', सचिन अहिरांचा भाजपवर हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com