MP Arvind Sawant News : रिक्षावाला विधानावर शिवसेना आक्रमक; खासदार सावंतांच्या प्रतिमेला पुण्यात जोडे मारो आंदोलन

Pune Shivsena : खासदार सावंत यांच्या विधानामुळे राज्यात संताप
Pune Shivsena Agitation
Pune Shivsena Agitation Sarkarnama
Published on
Updated on

Pune Shivsena Agitation : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील अलका टॉकीज चौकात शिवसेनेने केलेल्या आंदोलनात खासदार अरविंद सावंत यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. तसेच सावंत यांचा पुतळाही जाळण्यात आला.

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर युतीतील भाजप (BJP) आणि शिवसेनेत वाद झाला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचे (MVA) सरकार स्थापन करण्यात आली. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. त्या मागील घडामोडींबाबत सांगताना खासदार सांवत यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत एक विधान केले. त्या विधानावरून राज्यात सावंत यांचा शिवसेनेकडून निषेध केला जात आहे. पुण्यातही खासदार सावंत यांच्याविरोधा घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या फोटोला जोडे मारून पुतळाही जाळण्यात आला.

Pune Shivsena Agitation
Rajan Patil News : राजन पाटलांनी पुन्हा ताकद दाखवली : मोहोळ बाजार समिती बिनविरोध; ७५ वर्षांपासून वर्चस्व कायम

काय केलं होतं अरविंद सावंत यांनी वक्तव्य?

खासदार सावंत (Arvind Sawant) म्हणाले होते की, "महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये दोन-दोन मुख्यमंत्री आहेत. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आहेत. राष्ट्रवादीत दिग्गज नेते आहेत. छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार. तर या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? याच्या हाताखाली तुम्ही काम करणार का? तरीही उद्धव ठाकरेंनी नाव दिलं होतं. नाही, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेच होतील. पण त्यानंतर शरद पवारांनी गळ घातली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवधनुष्य तुम्हालाच घ्यावं लागेल. आपण काय रणांगणातून पळणारे नाही ना. मग उद्धवजींनी शरद पवारांचा शब्द स्वीकारला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले."

Pune Shivsena Agitation
Farmers Leader Join BRS News : परभणीतही बीआरएसचा प्रभाव, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश..

दरम्यान, खासदार सावंत यांनी आपल्या विधानावरून यू टर्न घेतला आहे. त्यांनी सांगितले की, शरद पवार यांनी इतर कुणी नको, उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्याची गळ घातली होती. त्यानुसार ठाकरे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, माझ्या भाषणात ओघाने रिक्षावाला हा शब्द आलेला आहे. तो शरद पवार यांनी उच्चारलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com