Nana Bhangire Ready for Agitation : राज्यात पक्षाची सत्ता तरी 'नानां'चं कोणी ऐकेना? ; अखेर रस्त्यावर उतरून आंदोलनाची केली तयारी!

Shiv Sena Pune City Chief Nana Bhangire : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून भानगिरे यांची ओळख आहे. त्यांनाच आंदोलन करायची वेळ येत असेल तर इतरांनी काय करावे, असाही प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.
Nana Bhangire
Nana BhangireSarkarnama
Published on
Updated on

Pune Civil Issue and Nana Bhangire : शिवसेनेत बंड करून 40 आमदारांना बरोबर घेऊन बाहेर पडणाऱ्या आणि मुख्यमंत्रिपद घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पुणे शहर प्रमुखाचे कोणीच ऐकत नसल्याचं समोर आलं आहे.

कारण, गंगाधाम मार्केटयार्ड येथील रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी करावी, अशी मागणी यापूर्वी देखील अनेकदा करून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार नाना भानगिरे यांनी केली आहे.

मार्केटयार्ड जवळील गंगाधाम रस्त्यावर अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर बुधवारी एका भरधाव डंपरने दुचाकी वरून जात असणाऱ्या दोन महिलांना चिरडले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. अशा भीषण अपघातामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, याकडे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे(Nana Bhangire) यांनी लक्ष वेधले आहे.

Nana Bhangire
Pune Shiv Sena News : मुख्यमंत्री शिंदेना पुण्यातून मोठा झटका; शहराध्यक्ष नाना भानगिरे पक्ष सोडणार?

या परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पाची कामे सुरु असल्यामुळे बांधकाम साहित्य घेऊन येणारे ट्रक, डंपर या रस्त्यावरून भरधाव वेगाने जातात. या रस्त्यावरून जाताना तीव्र चढ उतार आहे. तसेच हा रस्ता अरुंद असल्यामुळे तिथे अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली होती.

मात्र, अवजड वाहनांसंदर्भात नव्याने आदेश काढल्यानंतर वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार तेथील रस्त्याच्या वाहतुकीवरील निर्बंध उठविण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर अपघातांच्या मालिका सुरु झाल्या आहेत, असा आरोप भानगिरे यांनी केला आहे.

या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांबाबत वारंवार वाहतूक पोलीस तसेच आरटीओ यांच्याकडे पाठपुरावा करून देखील काहीही उपाययोजना केल्या जात नसल्याचेही भानगिरे यांनी सांगितले. या रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी तातडीने या रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालावी यासाठी भानगिरे यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला निवेदन दिले आहे.

Nana Bhangire
Supriya Sule : 'अहो मुख्यमंत्रीसाहेब... पुण्याकडे लक्ष द्या!'; खासदार सुळे मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र !

आरटीओ ने याबाबत तातडीने निर्णय घेऊन योग्य ती अंमलबजावणी न केल्यास नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा देखील भानगिरे यांनी दिला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे खंदे समर्थक म्हणून भानगिरे यांची ओळख आहे. त्यांनाच आंदोलन करायची वेळ येत असेल तर इतरांनी काय करावे, असा प्रश्न विचारला जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com