PCMC Politics: प्रवेश केलेला अट्टल गुन्हेगार असल्याचे कळताच प्रवेश स्थगितीची शिवसेनेवर ओढवली नामुष्की; वाचा काय आहे प्रकरण?

Shivena (Shinde Group) Politics| आगामी महापालिका निवडणुकीचे गणित जुळविताना `भरती`च्या नादात खा.बारणे व पक्षावर ही नामुष्कीची पाळी आली.
PCMC Politics:
PCMC Politics:Sarkarnama

PCMC Politics : खुन, खुनाच्या प्रयत्नासारखे दीड डझनहुन अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत गुन्हेगार प्रशांत दिघे याचा काही दिवसांपुर्वी शिवसेना (शिंदे गट) प्रवेश झाला होता. खुद्द खासदार श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील (PCMC Politics) येथील निवासस्थानी १८ मार्च २०२३ रोजी त्याचा सभारंभपुर्वक प्रवेश झाला होता. पण त्याच्याबाबतची वस्तुस्थिती समजताच हा प्रवेश व त्याला दोन दिवसांपूर्वी दिलेले पद स्थगित करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली. (Shiv Sena suspended Prashant Dighe's appointment as soon as he was found to be a criminal)

काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगत दिघेचा हा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला. त्याची पत्नी खुशबू आणि या दोघांच्या अडीचशे समर्थकांनीही त्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांचे खा.बारणे (Shrirang Barane) यांनी स्वत: शिवबंधन बांधून स्वागत केले. त्यावेळी शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. खूशबू ही चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी उपाध्यक्षा असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, हा दावा राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी लगेच खोडून काढला.खूशबू ही पक्षाची साधी कार्यकर्तीही नसल्याचे स्पष्ट केले होते.

PCMC Politics:
Supreme Court Breaking : सर्वोच्च न्यायालयाचा 'त्या' वकिलाला दणका; शिवसेना भवन आणि निधी शिंदेंना देण्याची याचिका फेटाळली

परवा प्रशांत दिघेला युवासेनेचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र हे खा. बारणेंच्या हस्ते देण्यात आले.त्यानंतर त्याचे खरे बॅकग्राऊंड समजताच शिवसेनेचे (Shivsena) पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी त्याचा प्रवेश स्थगित करणारे पत्र काल काढले.दिघेची पार्श्वभूमी माहिती नव्हती.तसेच काळेवाडीतील पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्याने त्याला प्रवेश दिल्याची सारवासारव त्यांनी केली. दिघेचा पक्षाशी कोणताही सबंध नसल्याचे सांगत तो कुठल्याही पदावर नसल्याचेही त्यांनी त्यात स्पष्ट केले आहे. मात्र, त्याच्याबरोबर शिवसेनेत प्रवेश केलेली त्याची पत्नी खुशबू व समर्थकांचे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.

PCMC Politics:
Uddhav Thackeray News: ...तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा उध्दव ठाकरेंनाच पसंती! सी व्होटर संस्थेच्या सर्व्हेत नेमकं काय?

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीचे गणित जुळविताना `भरती`च्या नादात खा.बारणे व पक्षावर ही नामुष्कीची पाळी आली. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिघेविषयीची माहिती दडवून ठेवल्याने आणि प्रवेश घेणाऱ्याची पार्श्वभूमी न पाहता पद दिले गेल्याच्या या प्रकाराची खा. बारणेंनी गंभीर दखल घेतली आहे. सध्या ते दिल्लीत आहे. ही घटना कळताच ते शहरात येणार असून येत्या मंगळवारी शहर पक्ष पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे त्यांचे पुत्र आणि शहराचे युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यांनी सरकारनामा'ला सांगितले. त्यात पक्षप्रवेश देताना आणि पदवाटप करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे,अशी माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com