Pune Politics : म्हणून ठाकरेंच्या सैनिकांनी मानले मंत्री मोहोळ यांचे आभार, म्हणाले, "हा तर आदित्य ठाकरेंच्या भूमिकेचा विजय..."

Pune Politics Shivsena UBT And BJP : विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने विजय मिळवला त्याच पद्धतीने महापालिकेमध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
Muralidhar Mohol, Aditya Thackeray
Muralidhar Mohol, Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 Jan : विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने विजय मिळवला त्याच पद्धतीने महापालिकेमध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने (BJP) रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

याच दृष्टिकोनातून सातत्याने शहरातील विकास कामांच्या दृष्टिकोनातून महापालिकेत बैठकांचे सत्र सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी महापालिकेत शहरातील विविध प्रकल्पांवर घेतलेल्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केलेल्या पौडफाटा बालभारती रस्त्याच्या विषयावर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी विरोध लक्षात घेत, यावर तुर्तास चर्चा नको, अशी भूमिका घेतली.

त्यामुळे शिवसेना, (Shivsena) पर्यावणप्रेमींची भूमिका मोहोळ यांनी घेतल्याने हा शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय असून, शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख संजय मोरे यांनी मोहोळ यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेत पुणे शहरातील विविध प्रश्न आणि प्रकल्पांचा आढावा घेतला. बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पौड फाटा बालभारती रस्त्याचा विषय मांडला.

पण पर्यावरणप्रेमींचा विरोध लक्षात घेत तो विषय मोहोळ यांनी तिथेच थांबवला. मोहोळ यांनी या रस्त्याबाबत घेतलेली भूमिका शिवसेनेची आहे. पुणेकर पर्यावरणवादी आहेत. तीच भूमिका मोहोळ यांनी घेतस्याचं म्हणत शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी मोहोळ यांचे अभिनंदन केलं. मोहोळ यांच्या भूमिकेवर बोलताना संजय मोरे म्हणाले, "शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पौड फाटा बालभारती रस्त्याबाबत पर्यावरणाची घेतलेली भूमिका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पालिकेच्या बैठकीत घेतली.

Muralidhar Mohol, Aditya Thackeray
Beed Police : "मी प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी सुद्धा..."; बजरंग सोनवणे यांच्याविरोधात पोलिसाने केलेली 'ती' वादग्रस्त पोस्ट व्हायरल

त्यांची भूमिका शिवसेनेची आहे आणि पुणेकर पर्यावरणप्रेमी लोकांची आहे. तीच भूमिका मोहोळ यांनी घेतली. याबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो." पुणे महानगरपालिकेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरातील विषयावर बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी अनेक विषयावर महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनी सदर बैठकीत बालभारती रस्त्याचा विषय मांडला. पण तो विषय मंत्री मोहोळ यांनी तिथेच थांबविला.

Muralidhar Mohol, Aditya Thackeray
Santosh Deshmukh : 9 जानेवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती बंद! संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांबाबत सरपंच परिषदेने केली 'ही' मोठी मागणी

त्यासाठी पर्यावरण प्रेमी मुरलीधर मोहोळ यांचे शिवसेनेच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन करतो. आमचे नेते आदित्य ठाकरेंनी पौड फाटा बालभारती रस्त्यावर जी पर्यावरणाची भूमिका घेतली होती, तीच भूमिका मोहोळ यांनी पालिकेच्या बैठकीत घेतली. त्यांनी या रस्त्याबाबतची चर्चा आता नको, अशी भूमिका घेतली. ही भूमिका शिवसेनेची आहे. पुणेकर पर्यावरणवादी लोकांची आहे. तीच भूमिका आपले खासदार केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असं मोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com