Shivdeep Lande : तुझ्या एका निर्णयाने मला हादरवून टाकलं..! शिवतारेंचे जावई शिवदीप लांडेंची पत्नीविषयी भावनिक पोस्ट

Shivdeep Lande Wife Mamta | Emotional Post Viral : नातेवाईकांमध्ये भाऊ साथ सोडू शकतो, मुलगा पाठ फिरवू शकतो, बहीण दूर जाऊ शकते, अगदी पत्नीही जीवन-मरणाच्या या युद्धात साथ सोडू शकते. पण मुलगी निःस्वार्थपणे उभी राहते, असे शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे.
Shivdeep Lande Wife Mamta Lande
Shivdeep Lande Wife Mamta LandeSarkarnama
Published on
Updated on

Emotional post social media : शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर नुकतीच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची लेक ममता यांनीच वडिलांना आपली किडनी दान केली. बापासाठी धावून आलेल्या या लेकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवतारेंचे जावई माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनीही पत्नीच्या या निर्णयाचे कौतुक करणारी भावनिक पोस्ट सोशल मीडियात केली आहे.

शिवदीप लांडे यांनी बिहार पोलीस दलात अनेक वर्षे सेवा केल्यानंतर विधानसभा निवडणुकीआधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांनी ही निवडणूकही लढविली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. या संपूर्ण वाटचालीत त्यांना पत्नी ममता यांची खंबीरपणे साथ लाभली. वडिलांना किडनी दान केल्यानंतर ममता यांच्याविषयी लांडे यांनी सोशल मीडियात भरभरून लिहिले आहे.

शिवदीप लांडे यांनी पत्नीला उद्देशून म्हटले आहे की, आयुष्यात अनेकदा प्रतिकूल परिस्थिती आली, पण मी डगमगलो नाही, ठामपणे उभा राहिलो. पण तुझ्या एका निर्णयाने मला हादरवून टाकले. वडिलांना नवं आयुष्य देण्यासाठी स्वतःची किडनी दान करण्याचा घेतलेला निर्णय. तुझं वडिलांप्रती असलेलं निःस्वार्थ समर्पण, त्याग पाहून मी नतमस्तक झालो आहे.

Shivdeep Lande Wife Mamta Lande
Eknath Shinde Shiv Sena : निवडणुका संपताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उलथापालथ; उदय सामंत, राणे, ज्योती वाघमारे, गोगावले, म्हस्केंची टीम सज्ज...

मागील तीन महिन्यांत ऑपरेशनसाठी सुरू असलेल्या वैद्यकीय तपासण्या, कागदपत्रांची जुळवाजुळव, कायदेशीर अडचणी, हे सगळं तू एकटीने पाहिलं. मी फक्त मूक प्रेक्षक बनून तुला पाहत होतो. देव माणसाच्या आयुष्यात मुलगी का देतो?, याचा विचार करत राहिलो. आज त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आईची सोबत आयुष्यात एका टप्प्यापर्यंतच असते आणि त्या आईची उणीवेची पूर्तता देव आयुष्यभर मुलीच्या रूपाने करतो, अशी भावना लांडे यांनी व्यक्त केली आहे.

Shivdeep Lande Wife Mamta Lande
US Strike : मोठी बातमी : भारताकडे उड्डाण करण्याआधीच अमेरिकेकडून इराणी विमानावर एअरस्ट्राईक

किडनी प्रत्यारोपणानंतर मुंबईतील आयसीयूमध्ये तुझा निरागस चेहरा पाहताना डोळ्यांतून वाहणारे अश्रू थांबत नाहीत. का थांबत नाहीत हे अश्रू? आज समजलं, नातेवाईकांमध्ये भाऊ साथ सोडू शकतो, मुलगा पाठ फिरवू शकतो, बहीण दूर जाऊ शकते, अगदी पत्नीही जीवन-मरणाच्या या युद्धात साथ सोडू शकते. पण मुलगी निःस्वार्थपणे उभी राहते, असे लांडे यांनी म्हटले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com