Sanjay Raut on Fadnavis : 'पेशवे फार दिलदार लोक, फडणवीसांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला हवा होता', राऊतांचा खोचक टोला!

Sanjay Raut on Devendra Fadnavis : विकासाच्या मुद्द्यावरती भाष्य केले नसल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याने आपले 1000 रुपये वाचले अशी मिश्किल टिपणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर त्याचा ठाकरे सेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena politics Maharashtra : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणामध्ये विकासाचा मुद्दा दाखवा आणि हजार रुपये घ्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती भाष्य केले नसल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याने आपले 1000 रुपये वाचले अशी मिश्किल टिपणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर त्याचा ठाकरे सेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?

उद्धव ठाकरेंच्या भाषणार पत्रकारांनी प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, "मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेल. कारण उद्धव ठाकरेंनी माझे 1 हजार रुपये वाचवले आहेत. मी आवाहन केले होते, की उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. मी काही त्यांचे भाषण ऐकले नाही.

परंतु मी पत्रकारांकडून माहिती घेतली. उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केले नाही. त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

त्यावर प्रतिक्रिया देताना पुण्यात संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे फार कंजूस माणूस आहेत. त्यांनी पुण्यातून पेशव्यांचा आदर्श घ्यायला हवा होता. पेशवे हे फार दिलदार माणसं होती. जसं की नाना फडणवीस. मात्र देवेंद्र फडणवीस हे फक्त 1000 ची पैज लावत आहेत उद्धव ठाकरे यांच्यावर.

भाषणामधून उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. शेतकऱ्यांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई द्यायला हवी यावर भाष्य केलं. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकलं मात्र जेव्हा ते शेतकऱ्यांच्या बाबत बोलत होते. तेव्हा फडणवीस हे कानामध्ये बोळा घालून बसले होते का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
Ajit Pawar Politics : अजित दादांचा नाशिकच्या खासदारांना झटका; विकास कामांतही डावलले!

आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकरी आणि हेक्टरी कशा पद्धतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल. तसेच कर्जमाफी कशी राबवता येईल याबाबत भाष्य केलं. सरकार ओल्या दुष्काळाबाबत कशा प्रकारे फसवणूक करत आहे.हे देखील उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
High Court News: काय सांगता! न्यायाधीश करीत होते अमली पदार्थांची तस्करी; कोर्टानं केले सेवेतून पदमुक्त

उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळावा झालेल्या भाषणामध्ये ते विकासावर देखील बोलले आणि भाजप आरएसएस आणि मुंबई लुटणाऱ्यांचा त्यांनी बुरखा देखील फाडला. देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं ऐकणं पटणार नाही कारण ते लाचार माणसं आहेत अशी टीका राऊत त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com