मोदी सरकार जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष करतेय; शिवसेना खासदार बारणेंचा आरोप

Shrirang Barne|Marathi Language|Shivsena : मराठीच्या तुलनेत प्राचीन नसलेल्या इतर भारतीय भाषांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे, असा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
MP Shrirang Barne
MP Shrirang BarneSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : मराठीच्या तुलनेत प्राचीन नसलेल्या इतर भारतीय भाषांना केंद्र सरकारने (Central Government) अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने वारंवार मागणी करूनही मराठी भाषेला, (Marathi Language) मात्र केंद्राने तो अद्याप दिलेला नाही. या मुद्यावरून भाजप सत्ताधारी केंद्र सरकार जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आऱोप मावळचे शिवसेना (Shivsena) खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी बुधवारी (ता.६ एप्रिल) लोकसभेत केला. मराठीला तातडीने राजभाषा म्हणून मान्यता देण्याची विनंतीवजा मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या मार्फत केंद्र सरकारकडे केली.

MP Shrirang Barne
बारा आमदार अन् राऊतांवरील कारवाईबाबत पवारांनी तक्रार केली पण त्यावर मोदी काय बोलले?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत खासदार बारणे यांनी सभागृहाचे पुन्हा एकदा लक्ष वेधले. त्यांच्या या मागणीला शिवसेनेच्या इतर सदस्यांनी बाके वाजवून पाठिंबा दिला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत. प्राचीन परंपरा असलेली मराठी भाषा, अनेकांची बोली भाषा असलेल्या मराठी भाषेचा 2220 वर्षापूर्वींचा शिलान्यास देखील आहे. असे असतानाही आजपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बारणेंनी केला.

MP Shrirang Barne
भोसरीच्या रेडी रेकनर दरावरून आमदार लांडगेंची झाली पंचाईत; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

मराठीला गौरवशाली ऐतिहासिक परंपरा असून शेकडो वर्षांपासूनचे मराठीचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य, वस्तू इत्यादी देखील भारतीय पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातील मुख्य भाषा असलेली मराठी देशातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. ती बोलणा-यांची लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. हजारो वर्षापूर्वीची परंपरा राहिलेली मराठी भाषा, मराठी वाड:मय साहित्यांचे लेखन संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराज, वी.स.खांडेकर, विंदा कंरदीकर, पु.ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, मंगेश पाडगावकर याबरोबर अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेत साहित्य लिहिलेले आहे. ज्ञानेश्वरीत मराठीचा उल्लेख अतिशय सुंदर केला आहे. माझा मराठीचा बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिका मेळवीन' हजार वर्षांची परंपरा असलेली मराठी भाषा आहे. त्यामुळे मराठीला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारला सूचना करावी, अशी विनंती बारणेंनी लोकसभा अध्यक्षांना केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com