Pune News : पुणे लोकसभेसाठी सोमवारी मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात मोठे खिंडार पडले आहे. पुण्यातील युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.यामध्ये वैयक्तिक कारणामुळे पक्षाला वेळ देता येत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले जात असले तरी यामागे लोकसभा निवडणुकीच्या काळात आपल्याला विचारत न घेतल्याची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये (Shiv Sena) उभी फूट पडल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कुठेही विचारात घेतले नाही, म्हणून अनेकांनी युवा सेनेचा पुणे शहराचा व्हाट्स अॅप ग्रुप सोडला आहे. तर काहींनी थेट या ग्रुपवर आपले राजीनामे दिले आहेत. हा प्रकार शहरातील युवासेनेत ही मोठी फूट मानली जात असून पुढील काही दिवसांत आणखी काही युवा सेनेतील पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.पुण्यातील युवा सेनेतील अंतर्गत वाद या निमित्ताने चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकी दरम्यानच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसपुस सुरू असल्याबाबची माहिती समोर आली होती. याबाबत 'सरकारनामा' ने बातमी ही प्रसारित केली होती. मात्र निवडणुकीपुरते त्यावर पांघरून घालण्यात आले होते. आता मात्र युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनामांनंतर पुणे शहरातील शिवसेनेची फादर बॉडी असलेल्या संघटनेमध्ये देखील राजीनामांचे सत्र सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार आणि कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना पुण्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. यामुळे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर नाराज असून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा निवडणुकी दरम्यान सुरू होत्या. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा आयोजित करण्यात आली होती.
ही सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते. यासाठी मोठी जय्यत तयारी भानगिरे व त्यांच्या समर्थकांनी मोहंमदवाडी या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी भानगिरे यांच्या घरी जाणे टाळलं. मात्र दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे हे शिवापूर आले असताना त्यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांच्या घरी जात भोजन घेतले होते. यामुळे पुण्यातील शिवसैनिक चांगलेच नाराज झाले होते. त्यानंतरच नाना भानगरे राजीनामाच्या तयारीत होते असे देखील बोललं जातं होते.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.