IPS Amitabh Gupta : पुण्या-मुंबईत 22-25 कोटींचे फ्लॅट, 300 कोटींची माया; अमिताभ गुप्तांच्या ‘गुप्त’ संपत्तीबाबत धक्कादायक दावा

Anti Corruption Bureau Sudhir Alhat Pune Mumbai : पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांच्या मागणीवरून अमिताभ गुप्ता यांची अँटी करप्शन ब्युरोने चौकशी केली होती.
IPS Amitabh Gupta
IPS Amitabh GuptaSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहराचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीमध्ये तब्बल 300 कोटींची संपत्ती उघड झाली असल्याचा दावा केला जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्ता यांच्या संपत्ती बाबत गुप्त चौकशी पूर्ण केली असून आता उघड चौकशीसाठी परवानगी मागण्यात आल्याचे समजते. अशाप्रकारे उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्याची चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे.

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांच्या मागणीवरून अमिताभ गुप्ता यांची अँटी करप्शन ब्युरोने चौकशी केली होती. या चौकशीत अनेक तथ्य समोर आल्यानंतर आता उघड चौकशीची मागणी करण्यात येत आहे. उघड चौकशीची मागणी मान्य झाल्यास अमिताभ गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

IPS Amitabh Gupta
Sharad Pawar: शरद पवारांच्या उमेदवाराची EVM वरील शंका दूर होणार? 'या' मतदारसंघात होणार फेर मतमोजणी

याबाबत आल्हाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ गुप्ता यांनी तब्बल 300 कोटीहून अधिकची संपत्ती विविध राज्यांमध्ये जमवली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ॲमनोरा टाउनशिप मधील स्वीट वॉटर व्हिला प्रकल्पात त्यांनी जमिनीचा प्लॉट घेऊन त्यावर आलिशान व्हिला उभारला आहे. त्याची किंमत अंदाजे 25 ते 30 कोटी असल्याचा दावा आल्हाट यांनी केला आहे.

मुंबईतील सांताक्रुझ येथे आलिशान असा 22 कोटीचा फ्लॅट देखील त्यांच्या नावे असल्याचेही आल्हाट यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याखेरीज इतर राज्यातील देखील मोठ्या प्रमाणात जमीन आणि संपत्ती खरेदी गुप्ता यांनी केली असल्याचं देखील अल्हाट यांचं म्हणणं आहे.

IPS Amitabh Gupta
Shivsena News: ऑपरेशन टायगर, ठाकरेंच्या माजी आमदारांची सामंतांशी भेट; पक्षप्रवेशाबाबत मोठं विधान

त्यासोबतच पुणे पोलीस आयुक्तपदावर असताना अमिताभ गुप्ता यांनी 800 ते 1000 शस्त्र परवाने वाटले असून प्रत्येक परवान्यासाठी 15 ते 20 लाख रुपये घेतले असल्याचा धक्कादायक दावा देखील आल्हाट यांनी केला आहे. या सगळ्यांची विस्तृत चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी उघड चौकशी होणं आवश्यक असून उघड चौकशीसाठी सहा महिने उलटल्यानंतर देखील अद्याप परवानगी मिळालेली नाही.त्यामुळे ही परवानगी लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी आल्हाट यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com