Siddhrath Shirole : फिरायला, खेळायला मैदाने नाहीत; भाजप आमदाराचे विधानसभेत गाऱ्हाणे

Winter Session : ज्येष्ठ नागरिकांना, मुलांना अडचणींना सामोरे जावे लागते. यावर तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
Siddharth Shirole
Siddharth Shirolesarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session : विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहराचा विस्तार चारही दिशांना होत आहे. शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे नागरिकांना सकाळी फिरण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे इच्छा असतानाही ज्येष्ठ नागरिकांना, मुलांना अडचणींना सामोरे जावे लागते. यावर तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

पुणे शहरात अनेक शासकीय संस्था असून या संस्थांकडे मोठी मैदाने आहेत. ही मैदाने नागरिकांना फिरण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करत आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddhrath Shirole ) यांनी विधानसभेत आवाज उठविला. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Siddharth Shirole
Uddhav Thackeray Dharavi Morcha : समझने वालों को इशारा काफी है; ठाकरेंनी अदानींवरून PM मोदी, शाहांवर डागली तोफ

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात (Shivajinagar constituency ) कृषी महाविद्यालय, पोलीस परेड ग्राऊंड, सीओईपी, औंध आयटीआय, पॉलिटेक्निक कॉलेज अशा मोठ्या शासकीय संस्था आहेत. या शासकीय संस्थांकडे असलेली मैदाने मोठ्या आकाराची आहेत. मात्र, त्यांचा वापर सर्वसामान्य नागरिकांना करता येत नाही. या संस्थांच्या निर्बंधांमुळे अशा मैदानावर सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना फिरण्यासाठी परवानगी नाकारली जाते.

मैदाने तातडीने खुली करावीत

शहरात सद्यस्थितीला अत्यंत कमी मैदाने राहिली आहेत. त्यातही नागरिकांना तेथे प्रवेश दिला जात नसल्याने नागरिक व्यायामासाठी जाणार कुठे? फिरण्याची सुविधा नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना हा प्रश्न अधिक भेडसावतो, अशी माहिती त्यांनी सभागृहासमोर मांडली. शहरातील सर्व शासकीय संस्थांची मैदाने नागरिकांना व्यायामासाठी व मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास अनेक प्रश्न सुटतील. ही मैदाने तातडीने खुली करून द्यावी, अशी मागणीही आमदार शिरोळे यांनी केली आहे.

Siddharth Shirole
Pune Vetal Tekdi : आमदार शिरोळे म्हणतात स्थगिती दिली; मनपाकडून मात्र वेताळ टेकडी रस्त्याची चाचपणी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com