Sinhgad Education Society : सिंहगड शिक्षण संस्थेची सीबीआय, ईडी मार्फत चौकशी होणार, कोर्टाने दिले आदेश!

ED CBI Court : या संस्थेच्या तब्बल १० शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश पुणे विभागाचे शिक्षण संचालकांनी दिले होते. आता न्यायलायने थेट सीबीआय मार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.
 High Court orders ED CBI probe into Sinhgad Technical Education Society
High Court orders ED CBI probe into Sinhgad Technical Education Society sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केली जाणार आहे.

या संस्थेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ४४ शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दाखल २२० रिट याचिका दाखल केल्या होत्या. कर्मचाऱ्यांचे आठ वर्षांपासून थकीत असलेले वेतन आणि निवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ न मिळणे हा याचिकेचा प्रमुख मुद्दा होता.

संस्थेच्या व्यवस्थापनाने न्यायालयाला वारंवार खोटी आश्वासने दिली आणि न्यायालयाला दिलेल्या हमींचे पालन केलं नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांची थकीत देणी 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने थेट केंद्रीय तपास यंत्रणाच्या मार्फेत या संस्थेची चौकशीचे आदेश दिलेत. या विषयीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

 High Court orders ED CBI probe into Sinhgad Technical Education Society
Education Department : मोठी बातमी! सिंहगड संस्थेच्या १० शाळांची मान्यता रद्द, शिक्षण विभागाचे आदेश

१० शाळांची मान्यता रद्द

दरम्यान, यापूर्वीच शिक्षकांचे अनेक महिन्यांपासून वेतन थकल्याने आणि अध्यापनावर बहिष्कार टाकल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या संस्थेच्या तब्बल १० शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम यांनी दिले होते. यामध्ये सहा माध्यमिक आणि चार प्राथमिक शाळांचा समावेश आहे.

 High Court orders ED CBI probe into Sinhgad Technical Education Society
Pune News : 'सिंहगड इन्स्टिट्यूट'च्या मारुती नवलेंनी तब्बल 20 महिन्यांचा पगार थकवला; शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.