SIR Pune : 'एसआयआर'मध्ये नाव वगळले, काळजी नको! मुदतवाढ मिळाली, दुरुस्तीसाठी संधी!

SIR Revision Deadline Voter List : एसआयरमध्ये अनेकांची नावे वगळल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. त्यामुळे हरकती आणि दुरुस्तीसाठी पुणे जिल्ह्यात मुदतवाढ देण्यात आली आहे.
SIR voter list name excluded what to do
SIR Pune voter list name deletedSarkarnama
Published on
Updated on

SIR voter list name correction process: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदार यादीबाबत अनेक तक्रारी आहेत. अनेकांनी आपले नाव वगळ्याचा दावा केला आहे.सात सप्टेंबरपर्यंत याविषयी आक्षेप नोंदवण्यात येणार होते. मात्र, आता यामध्ये देखील मुदत वाढ देण्यात आली आहे.

मतदार यादीत नवीन मतदार म्हणून नाव नोंदविणे, नाव वगळण्याबाबत हरकत नोंदविणे तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता अथवा अन्य तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पात्र नागरिकांना ही प्रक्रिया ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

नवीन मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी फॉर्म ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी किंवा त्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म ७, तर नाव, पत्ता व अन्य तपशीलात दुरुस्तीसाठी फॉर्म ८ भरता येईल. ऑनलाइन अर्जासाठी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

ऑफलाइन अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करता येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी मतदार यादी तपासून आपले नाव समाविष्ट नसल्यास किंवा मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी आवश्यक अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

SIR voter list name excluded what to do
MPSC Exam Postponed : MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! गट-क परीक्षेची तारीख बदलली

२१ हजार ५५५ अर्ज प्राप्त

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदार यादीबाबत सुरू असलेल्या दावे व हरकतींच्या कालावधीत ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुणे जिल्ह्यात विविध प्रकारचे एकूण २१ हजार ५५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये फॉर्म ६ चे १२ हजार ४७२, फॉर्म ७ चे ६८१ आणि फॉर्म ८ चे ८ हजार ३६८ अर्ज आहेत.

SIR voter list name excluded what to do
SIR प्रारूप मतदार यादीत नाव नाही? घाबरू नका; 30 सप्टेंबरपर्यंत करा हे काम!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com