Pune News : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी २० वर्षीय सिया गोयल हिच्याबाबत पोलिसांच्या चौकशीत अत्यंत थरारक माहिती समोर आली आहे. वय अवघे २० वर्षे असले, तरी सियाने एखाद्या अट्टल आणि सराईत गुन्हेगाराप्रमाणे थंड डोक्याने हा सगळा हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
तपासादरम्यान पोलिसांना समजले आहे की, केतनला लोहगडावरून ढकलून देण्यापूर्वी सियाने गुगल, विविध वेब सिरीज आणि क्राईम पॉडकास्टचा सखोल अभ्यास केला होता. हत्या कशी करायची आणि पकडले गेल्यास पोलिसांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा, याचे पूर्वनियोजन तिने केले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, सियाने गुगलवर प्रामुख्याने चार गोष्टींचा शोध घेतला होता. महिला गुन्हेगारांना पोलीस कोठडीत मारहाण केली जाते का? हत्येच्या गुन्ह्यात पोलीस कशाप्रकारे चौकशी करतात? 'सोनम रघुवंशी' या आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर चौकशीत कोणते प्रश्न विचारले होते? सोनम रघुवंशीला उच्च न्यायालयाकडून जामीन कसा मिळाला होता?
या चार प्रश्नांच्या अभ्यासावरून पकडले गेल्यास कायदेशीरदृष्ट्या स्वतःचा बचाव कसा करायचा आणि पोलिसांसमोर काय बोलायचे, याची तयारी तिने आधीच करून ठेवली असल्याचे देखील बोले जात आहे.
याच प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला असून, मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वीच एका लॉजमध्ये गुपचूप विवाह केल्याच चौकशीत समोर आले आहे. चेतनने एका लॉजमध्ये सियाच्या कपाळावर कुंकू लावून हा विवाह केला होता. आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट्स, फोटो आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या फॉरेन्सिक तपासणीतून हा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.