Maval Loksabha News: ...अखेर बारणेंनी नेला उमेदवारी अर्ज; दाखल करण्याचा 'मुहूर्त'ही सांगितला!

Loksabha Election 2024 : `मावळ`ची पाटी शनिवारी राहिली कोरी, तीन दिवसांत फक्त एकाच उमदेवाराचा अर्ज दाखल
Shrirang Barne
Shrirang BarneSarkarnama

Maval News : मावळ लोकसभेसाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली. पण,गेल्या तीन दिवसांत फक्त एकाच उमेदवाराने तो दाखल केला. दरम्यान,शनिवारी (ता.20) महायुतीचे (शिंदे शिवसेना) श्रीरंग बारणे यांच्यासह दहा जणांनी 22 उमेदवारी अर्ज नेले.आजपर्यंत एकुण 49 जणांनी 92 अर्ज नेले आहेत. पण,फक्त एकानेच तो भरला आहे.

मावळमधील मुख्य उमेवारांनी आजपर्यंत उमेदवारी दाखल केलेली नाही. बारणे ती सोमवारी (ता.२२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत.तर,त्याच्या दुसऱ्या दिवशीच (ता.२३) आघाडीचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील Sanjyog Waghere हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.त्यावेळी शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हजर राहणार आहेत.

Shrirang Barne
Maval Lok Sabha Election 2024 : मावळात ठाकरे गटात बंडखोरी? वाघेरे विरुद्ध वाघेरे रिंगणात उतरण्याची शक्यता

अर्ज भरताना बारणे मोठे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे आज सांगण्यात आले. सोमवारी सकाळी 10 वाजता खंडोबा माळ,आकुर्डी येथून मिरवणुकीने जाऊन ते अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मतदारसंघातील सहाही आमदार व त्यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान,बारणेंनी प्रचाराची पहिली फेरी पूर्णही केली असून तिच्या दुसऱ्या फेरीत बड्या नेत्यांच्या सभा होणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीरंग बारणेंच्या (Shrirang Barne) जोडीने शेखर पांडुरंग चंदनशिवे (पिंपरी ,राष्ट्रवादी युवक कॉग्रेस), विजय निवृत्ती वाघमारे (वाकड, बहुजन समाज पार्टी), सागर तुकाराम जगताप (पिंपळे सौदागर, बहुजन समाज पार्टी), शिवाजी किसन जाधव (थेरगाव, भारत राष्ट्र समिती) यांच्यासह अपक्षांनी शनिवारी उमेदवारी अर्ज नेले. मात्र,एकानेही तो दाखल केला नाही. दरम्यान,गेल्या तीन दिवसात फक्त क्रांतीकारी जयहिंद सेनेचे यशंवंत पवार (कर्जत) यांनी काल (ता.19) तो भरला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Shrirang Barne
Vanchit Bahujan Aaghadi : 'वंचित बहुजन आघाडी'ची सातवी उमेदवार यादी जाहीर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com