NCP Pune: सुनेत्रा पवारांची पुण्यात डिनर डिप्लोमसी; 'शिवाई' बंगल्यावरील 'त्या' गुपित बैठकीची इनसाईड स्टोरी!

Sunetra Pawar, Pune News, NCP Meeting: पुण्यातील 'शिवाई' बंगल्यावर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधला. विकासकामे, प्रशासनावरील नाराजी आणि संघटन बळकटीकरणावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत पातळीवर मोठ्या घडामोडी घडताना पाहिला मिळत आहेत. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 'शिवाई' बंगल्यावर नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसह पंचायत समितीच्या सभापतींशी औपचारिक संवाद साधला. वरवर पाहता हा केवळ एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम वाटत असला, तरी या 'डिनर डिप्लोमसी'च्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्याचा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची नाडी ओळखण्याचा हा मोठा प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या निवासस्थानी म्हणजेच 'शिवाई' बंगल्यावर झालेल्या या विशेष बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर कमालीची तीव्र नाराजी व्यक्त केली. विकासकामांपासून ते निर्णय प्रक्रियेपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर सदस्यांनी आपल्या गाऱ्हाण्यांचा पाढाच सुनेत्रा पवार यांच्यासमोर वाचला. या 'डिनर डिप्लोमसी'मुळे आता पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नवीन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Sunetra Pawar
Maharashtra News Live Update: अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,10 लाख टन कांदा...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची संपूर्ण सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती आली आहेत. सुरुवातीच्या काळात अनेक राजकीय आव्हानांचा सामना केल्यानंतर त्यांनी आता थेट संघटनात्मक पातळीवर आपली सक्रियता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी केलेले भाषण प्रचंड चर्चेत राहिले होते.

त्यानंतर आता थेट जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींसाठी आयोजित केलेले हे स्नेहभोजन म्हणजे त्यांच्या आगामी राजकीय रणनीतीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या कार्यक्रमासाठी 'शिवाई' बंगल्यावर एक मोठा आणि भव्य शामियाना उभारण्यात आला होता. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या शाही मेजवानीसह सुनेत्रा पवारांनी आत्मीयतेने विचारपूस केल्याने उपस्थित सर्वच सदस्य भारावून गेल्याची चर्चा रंगली आहे.

Sunetra Pawar
Sunetra Pawar Politics : सुनेत्रा पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर, आमदार-खासदारांची आजच बैठक घेणार, नेमकं कारण काय?

दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्था अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्या, तरी भाजपकडून सहकार क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांशी कनेक्ट ठेवणारी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

स्थानिक नेत्यांची गाऱ्हाणी

या औपचारिक संवादादरम्यान जिल्हा परिषद सदस्यांनी थेट प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि मनमानी कारभारावर बोट ठेवले. जिल्ह्यात अनेक विकासकामे मंजूर होऊनही ती अद्याप का सुरू झालेली नाहीत, असा संतप्त सवाल सदस्यांनी उपस्थित केला. आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही, तसेच कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींना अजिबात विश्वासात घेतले जात नसल्याची खंत अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी बोलून दाखवली.

यामध्ये महिला सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित अडचणी आणि रखडलेल्या कामांची माहिती सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडली. काही सदस्यांनी तर आक्रमकपणे, "आमचं तर सोडा, पण झेडपी प्रशासन नेमके काय निर्णय घेतेय हे स्वतः पदाधिकाऱ्यांना देखील माहिती नसते," अशा शब्दांत प्रशासकीय कारभारावर संताप व्यक्त केला. यानंतर आता सुनेत्रा पवार यावर काय ॲक्शन घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com