

Pune Online Game News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित 'जनता दरबारात' आलेल्या एका तक्रारीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तत्काळ दखल घेत पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
ऑनलाईन गेमच्या वादातून पुण्यातील एका निष्पाप तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
मुंबईतील पक्ष कार्यालयात सुरू असलेल्या जनता दरबारात पुण्यातील एका तरुणाचे आई-वडील अत्यंत आशेने आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी पोहोचले होते. ऑनलाइन गेमच्या वादातून काही तरुणांनी त्यांच्या निष्पाप मुलावर कोयत्याने वार करून गंभीर मारहाण केल्याची व्यथा त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडली. 'रील स्टार' असलेल्या या संशयित आरोपींविरुद्ध पवई पोलीस ठाण्यातही आधीपासून गुन्हे दाखल असल्याचे सांगत, पीडित कुटुंबाने संबंधित कागदपत्रे, छायाचित्रे आणि लिंक्स पुरावे म्हणून सादर केले.
पीडित आई-वडिलांची आर्त हाक ऐकून सुनेत्रा पवार यांनी प्रकरणाचे गांभीर्य तत्काळ ओळखले. त्यांनी थेट बैठकीतूनच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन लावला.
फोनवर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, "मुलावर कोयत्याने वार करण्यात आला आहे, तो सध्या बचावला असला तरी त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करा. आरोपींची माहिती आणि सर्व पुरावे तुम्हाला पाठवले जात आहेत. गुन्हेगारांवर कडक कारवाई होऊन त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे."
तरुणाई भरकटत चाललेल्या आणि हिंसाचाराला प्रवृत्त करणाऱ्या ऑनलाइन गेम्सबाबतही सुनेत्रा पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे."असे हिंसक आणि चुकीच्या दिशेने नेणारे ऑनलाइन गेम्स कायमचे बंद झाले पाहिजेत, अशी भूमिका घेत त्यांनी याबाबतही पोलीस प्रशासनाला आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.