Sunil Tatkare News : सुनील तटकरेंच्या कार्यक्रमातील बॅनरवरून अजितदादा, सुनेत्रा पवारांचे फोटो गायब; राष्ट्रवादीत राडा, वाद पेटला!

Sunil Tatkare Ajit Pawar Sunetra Pawar : सुनिल तटकरे यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमात तटकरे उपस्थित होते. मात्र, त्या कार्यक्रमात लावलेल्या पोस्टरवर सुनेत्रा पवार, अजित पवार यांचे फोटो नव्हते.
Political discussions are rife as the banner of Sunil Tatkare's program does not have photos of Ajit Pawar and Sunetra Pawar.
Political discussions are rife as the banner of Sunil Tatkare's program does not have photos of Ajit Pawar and Sunetra Pawar.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : सुनील तटकरे यांच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यक्रम पार पडला. पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाला सुनील तटकरे यांच्या सोबतच मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात स्टेजवर लावलेल्या बॅनरवरून सध्या वाद सुरू झाला आहे. कार्यक्रमसाठी लावलेला पोस्टरवर सुनील तटकरे, आदित्य तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो नसल्याचे दिसते आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी संताप व्यक्त केला आहे.

उदय कुमार आहेर म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशिवाय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मान्य नाही. परवा रायगड जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात या सर्वांचे फोटो वगळून कार्यक्रम घेण्यात आला ही गोष्ट मनाला पटणारी नाही.

Political discussions are rife as the banner of Sunil Tatkare's program does not have photos of Ajit Pawar and Sunetra Pawar.
NCP News: आम्ही पोरके झालो! मराठा नेत्यांची खदखद...; पदाधिकाऱ्याचं तटकरे, पटेलांवर जोरदार टीकास्त्र

त्यामुळे वेळेत यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. तरच पक्ष व्यवस्थित चालेल. परंतु या सर्वांना टाळून जर पक्षामध्ये कोणी मनसुबे मनामध्ये रचत असेल तर त्या व्यक्तीच अवघड आहे, असे देखील उदयकुमार आहेर यांनी म्हटले आहे.

Political discussions are rife as the banner of Sunil Tatkare's program does not have photos of Ajit Pawar and Sunetra Pawar.
NCP internal conflict : सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र, त्यानंतर काहीच वेळात प्रदेशाध्यक्ष तटकरेंचा रोहित पवारांना इशारा; म्हणाले, 'अजितदादा असतानाही...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com