Supriya Sule Accident: सुप्रिया सुळेंच्या कारला अपघात! गुजरात पासिंगच्या वाहनाची जोरदार धडक; स्वतः शेअर केला थरारक अनुभव

Supriya Sule Accident: मुंबई-पुणे प्रवासादरम्यान हा अपघात झाला असून सुप्रिया सुळे यांनी स्वतःहून या अपघाताची माहिती दिली आहे.
Supriya Sule Car Accident
Supriya Sule Car Accident
Published on
Updated on

Supriya Sule Car Accident: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात झाल्याचं वृत्त आहे. मुंबई-पुणे प्रवासादरम्यान ही दुर्घटना घडली असून एका गुजरातच्या वाहनानं त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. हा थरारक अनुभव स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

घटना काय घडली?

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत तसंच व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे आपल्या कारला झालेल्या अपघाताची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, "आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत कटू अनुभव आला. वाहन क्रमांक GJ-13 CF 5257 ने बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे, माझ्या गाडीला बाजूने जोरदार धडक दिली. सुदैवाने, सर्वजण सुखरूप आहेत. अशा प्रकारच्या घटना ही एक गंभीर आठवण करून देतात की, आपल्या रस्त्यांवर अतिवेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणा करणे यामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना आवाहन करते की, कृपया सीट बेल्ट वापरा, सावध राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा. जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित बनतील" सुळेंनी शेअर केलेल्या कार नंबर प्लेटवरुन ही गाडी गुजरात पासिंगची कार असून किया कंपनीची आहे.

Supriya Sule Car Accident
Joseph Vijay: ठरलं! जोसेफ विजय यांचा उद्या शपथविधी; स्टेडियममध्ये येणार गर्दीचा महापूर? 'या' तारखेला बहुमत करावं लागणार सिद्ध

सुप्रिया सुळेंची स्थिती कशी?

दरम्यान, आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवरुन माहिती देताना सुप्रिया सुळे लिहितात की, माझे ड्रायव्हर श्री. गायकवाड आणि मी आम्ही सुखरुप आहोत. आम्हाला दुखापत झालेली नाही पण गाडीचं नुकसान झालं आहे. अतिशय बेदरकपणे आणि निष्काळजीपणामुळं वाहन चालवल्यानं हा प्रकार घडला आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com