Supriya Sule On Sunil Tingre : पुण्यात राजकारण पेटलं, 'पोर्शेकार' अपघातप्रकरणी टिंगरेंनी पाठवली शरद पवारांना नोटीस; सुळेंचा हल्लाबोल

Vadgaon Sheri Assembly Election 2024 : पोर्शे अपघात प्रकरणाच्या निमित्ताने आमदार सुनील टिंगरे यांचे नाव सातत्याने चर्चेत होतं. अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यवसायायिक अग्रवाल यांना मदत करण्याच्या हेतुने टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून करण्यात येत होता.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मध्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवत दोन तरुणांना उडवलं होतं.या अपघातात त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते.

अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरल्यामुळे हे प्रकरण तापलं आहे. आता आमदार सुनील टिंगरे यांनी याप्रकरणी माझी बदनामी करण्यात आली तर तुम्हांला नोटिस पाठवू आणि कोर्टात खेचू असा इशारा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे यांची वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता.8)जाहीर सभा झाली.यावेळी सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Supriya Sule
Ajit Pawar : बारामतीत मोदींची सभा होणार का? अजितदादा म्हणाले, 'मी एकटाच बस्स; कोणी येण्याची गरज नाही'

सुळे म्हणाल्या,मी स्वतः नोटीस पाहिली नाही,मंचावर एका व्यक्तीने ती बघितली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी धमकी दिली आहे. जर तुम्ही पोर्शेकार अपघातामध्ये माझी बदनामी केली, तर तुम्हाला कोर्टात खेचू अशाप्रकारचा इशारा दिल्याची माहिती नोटिसमध्ये असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

हा देश अदृश्य शक्तीने चालणार नाही, संविधानाने चालणार आहोत. Porsche चालकाकडून हत्या झाली असेल तर आम्ही बोलणार आहोत. स्थानिक आमदार पोलीस ठाण्यात गेले होते, हे तुम्ही रिपोर्ट केले आहे. पवारसाहेब जर खरं बोलले तर त्यांना वकिलातून नोटीस पाठवणार आहे. तर सत्यमेव जयते, आम्ही तयार आहोत. ती नोटीस मी बघणार आहे, असंही खासदार सुळे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात वडगाव शेरी मतदारसंघातलं राजकीय वातावरण पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे तापण्याची शक्यता आहे.

Supriya Sule
Devendra fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले, 'मतांसाठी विदर्भात...'

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची चार तास कसून चौकशी केली होती. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सुनील टिंगरे यांचं नाव नसल्याचे समोर आले होते. या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून न्यायालयात 900 पानांची पहिले चार्जशीट दाखल केले आहे. त्यामध्ये अल्पवयीन आरोपीच्या आईचे, वडिलांचे, आजोबांचे आणि ससून मधील डॉक्टरांची नावे आहेत. मात्र आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नसल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंत या प्रकरणांमध्ये 50 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये सुनील टिंगरे यांची देखील चार तास पोलिसांनी कसून चौकशी केली होती. त्यामुळे आरोपपत्रात सुनील टिंगरे यांचे नाव येणार का? याबाबत चर्चा होती. मात्र पहिल्या आरोपपत्रात तरी टिंगरे यांच्या नावाच्या उल्लेख करण्यात आलेला नाही तरी देखील पुरवणी आरोपपत्रात त्यांचं नाव घेणार का हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com