Supriya Sule Amit Shah meeting : ''...त्यामुळे मी अमित शहांची पुन्हा एकदा भेट घेणार'' ; सुप्रिया सुळे यांचं विधान!

Supriya Sule latest news : ...त्यामध्ये अमित शहा यांनी लक्ष घालून महाराष्ट्राच्या सरकारला दिशा द्यावी
Political News : संसदीय प्रथेनुसारच आम्ही काम करतो. आज आम्हाला संसदेत जे कार्यालय मिळाले ते आमच्या मेरीटवर मिळाले असल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.
Supriya SuleSarakrnama
Published on
Updated on

Pune News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बीड हे गुन्हेगारांचा अड्डा बनला असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच बीडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्रालयाने तातडीने पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचे देखील मागणी सातत्याने विरोधकांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी बीडमधील परिस्थिती काही प्रमाणात सुधारली असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

Political News : संसदीय प्रथेनुसारच आम्ही काम करतो. आज आम्हाला संसदेत जे कार्यालय मिळाले ते आमच्या मेरीटवर मिळाले असल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.
Supriya Sule : माळेगाव साखर कारखान्याच्या निमित्त पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत? ; सुप्रिया सुळे यांनी दिलं उत्तर

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बीड(Beed) मधील प्रकरणासंदर्भात मागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी जी काही ॲक्शन घेतली आहे त्याबाबत मला त्यांचे आभार मानायचे आहेत. त्यामुळे मी त्यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहे.

Political News : संसदीय प्रथेनुसारच आम्ही काम करतो. आज आम्हाला संसदेत जे कार्यालय मिळाले ते आमच्या मेरीटवर मिळाले असल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.
Supriya Sule: शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आउटगोइंग रोखण्यासाठी रणनीती; सुप्रियाताई मैदानात

त्यांची भेट घेण्यासाठी मी अपॉइंटमेंट मागितली आहे. मात्र ती अद्याप मिळालेली नाही. मागच्यापेक्षा बीड मधील परिस्थिती जरा सुधारलेली आहे. त्याबद्दल अमित शहा(Amit Shah) यांचे आभार मानणार आहे. तसंच पुढे संतोष देशमुख आणि महादेव मुंडे आणि पुढे ज्या काही घटना घडत आहेत. त्यामध्ये अमित शहा यांनी लक्ष घालून महाराष्ट्राच्या सरकारला दिशा द्यावी कारण ज्या वेगाने सुधारणा व्हायला पाहिजेत त्या वेगाने सुधारणा होत नाहीत याबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे.

तसेच त्यांच्याकडे सहकार खातं असल्याने सहकारामधील आणि साखर उद्योगांमधील जे काही प्रश्न आहेत. ते अमित शहा यांच्या पुढे मांडणार आहे. त्याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी देखील करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com