Supriya Sule : माळेगाव साखर कारखान्याच्या निमित्त पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत? ; सुप्रिया सुळे यांनी दिलं उत्तर

Malegaon sugar factory : सुरुवातीला योगेंद्र पवार आणि त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ही निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

वPawar vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर राज्याने सुरुवातीला लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साथ दिली तर विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने मतदार उभे राहिल्याचं पाहायला मिळालं.

त्यानंतर आता पुन्हा एकदा पवार विरूध्द पवार अशी लढत माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये रंगण्याची शक्यता आहे. सुरुवातीला युगेंद्र पवार(Yugendra Pawar) आणि त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ही निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहे.

Supriya Sule
Supriya Sule: शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आउटगोइंग रोखण्यासाठी रणनीती; सुप्रियाताई मैदानात

याबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, आमच्याकडे ना संस्था आहेत, ना पैसा आहे आणि ना सत्ता आहे. तरीही पक्षफुटीनंतर अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्हाला त्यांच्यामागे ठामपणे उभे राहावे लागणार आहे. या निवडणुकीत सक्षम उमेदवार मिळत असतील आणि माळेगाव कारखान्याचा छत्रपती कारखाना होऊ द्यायचा नसेल तर आम्हाला निवडणूक लढवावी लागेल, असे म्हणत युगेंद्र पवार यांनी माळेगाव कारखाना निवडणुकीच्या राजकीय मैदानात उतरण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. त्यामुळे लोकसभा(Loksabha Election) , विधानसभा निवडणुकांनंतर माळेगावमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार लढत रंगण्याची शक्यता आहे. अशातच सुप्रिया सुळे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

सुप्रिया सुळे(Supriya Sule) म्हणाल्या, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे इलेक्शन आम्ही एका चिन्हावर लढत नाही. त्या ठिकाणी शेतकरी कृती समिती आहे. त्याठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत आणि त्या पूर्ण झालेल्या नाहीत. तसंच सध्या सत्तेत असलेल्यांच्या रोज वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची विनंती आहे आणि शेतकऱ्यांना पॅनल काढून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी लढणार आहोत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule
Vighnahar Sugar factory : 'विघ्नहर'वर सत्यशील शेरकरांचे एकहाती वर्चस्व; शेरकरांच्या तीन पिढ्यांची कारखान्यावर 40 वर्षांपासूनची सत्ता कायम!

यामध्ये राजकारण विषय नाही पॉलिसी विषय पण आहेत. सरकारने सरसकट कर्जमाफीचा विषय पाळलेला नाही. शेतकऱ्यांचे शंभर टक्के सोयाबीन सरकारने उचललेले नाही.कांद्यावरील टॅक्स शून्यावर आणण्याची मागणी आहे. मात्र ते अजून आलेला नाही.जास्त गहू असेल आपण गहू निर्यात केला पाहिजे, हे जर नाही केलं तर कष्ट करणारे शेतकऱ्यांना पैसे मिळणार कुठून? त्यामुळे पक्षाच्या विषय नाही मात्र माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक शेतकऱ्यांसाठी लढवणार आहोत. असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com