Mahayuti Politics
Mahayuti PoliticsSarkarnama

Local Body Elections : भाजपचा स्वबळाचा नारा फोल, महायुतीचं ठरलं! पहिली बातमी पश्चिम महाराष्ट्रातून...

Local Body Elections 2025: सर्वाधिक जागा भाजपकडेच असणार आहेत. तर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजीत पवार गट या घटक पक्षांना किती जागा दिल्या जाणार याकडे आता लक्ष असणार आहे.
Published on

Mahayuti Alliance Gains Momentum in Western Maharashtra : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत भाजप स्वबळाची तयारी करत असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कान टोचल्यानंतर भाजप महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरोधात महायुती अशीच लढत होण्याची शक्यता गडद होत चालली आहे. भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीत महायुती करण्याबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

आता पुढील टप्प्यात घटक पक्षांसाठी जागा वाटपाबाबत चर्चा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये जास्तीत जास्त जागा खेचून घेण्याबाबत घटक पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. शहरात सर्वाधिक मजबूत असलेल्या भाजपकडून सतत स्वबळाचा नारा देण्यात येत होता. पहिला महापौर भाजपचाच होणार, असाही दावा सातत्याने करण्यात येत होता. त्यामुळे भाजप स्वबळ आजमावण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत होती.

नव्या राजकीय घडामोडीनंतर भाजपचा स्वबळाचा नारा घेवून मागे पडल्याची ठोस माहिती समोर येत आहे. पक्षाच्या एका उच्चस्तरीय बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशीच लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. महायुती झाल्यानंतर घटक पक्षात भाजप हाच मोठा भाऊ असणार आहे.

Mahayuti Politics
Nupur Bora Case : सरकारी नोकरीत केवळ 5 वर्षे, महिला अधिकाऱ्याच्या घरात सापडली 2 कोटींची रोकड व दागिने; मुख्यमंत्रीही चक्रावले

सर्वाधिक जागा भाजपकडेच असणार आहेत. तर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजीत पवार गट या घटक पक्षांना किती जागा दिल्या जाणार याकडे आता लक्ष असणार आहे. भाजपकडून जास्तीत जास्त जागा खेचून घेण्यासाठी या दोन्ही घटक पक्षांकडून प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपावर तोडगा काढतांना मोठी कसरत होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपकडेच सध्या इच्छुकांचा संख्या शतकाच्या पुढे गेली आहे. त्यामुळे महायुतीकडून उमेदवारी मिळवितांना इच्छुकांची धाकधुक वाढणार आहे.

Mahayuti Politics
जिल्हाधिकारी स्वप्निल वानखडेंचा व्हिडीओ व्हायरल; अनाथ मुलीचं गाऱ्हाणं अन् जागेवरच आदेश...

प्रारुप प्रभाग रचना दोघांच्याही सोयीची

महाविकास आघाडीने लोकसभा, विधानसभा निवडणूकीत एकी दाखवली होती. महापालिका निवडणूकीसाठीही सुरुवातीपासून महाविकास आघाडी एकत्रीतपणे काम करीत आहे. विविध नागरी प्रश्नावर एकत्र येवून शक्ती प्रदर्शन करीत आहेत. आता तर प्रारुप प्रभाग रचना ही महायुती आणि महाविकास आघाडी यांना समसमान सोयीची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये उमेदवारी घेण्याबाबत गोंधळाची परिस्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com