Sushma Andhare : त्यांनी विषारी घोट पाजले, आता चॉकलेट देऊन काहीही फरक पडणार नाही, अंधारेंचा टोला !

Assembly session 2024 : चंद्रकांतदादा जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका, तुमच्या अशा चॉकलेटनी आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही, या भ्रमात राहू नका असेही सुषमा अंधारे म्हणाल्या...
Sushma Andhare, Devendra Fadanvis and Chandrakant Patil
Sushma Andhare, Devendra Fadanvis and Chandrakant PatilSarkarnama

Pune News : भाजपचे नेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा परिसरात आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब हे ठाकरे गटाचे नेते देखील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिलं. तर अनिल परब यांना पेढा भरवत शुभेच्छाही दिल्या यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पुण्यातील विधानभवन येथे गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाकडून शहरात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्जची (Drugs) वाढलेली प्रकरणे या विरोधात प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी सुषमा अंधारे उपस्थित होत्या. अंधारे म्हणाल्या, पुणे विद्येचे माहेरघर म्हटलं जात, पण आता याच पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पुण्यात फक्त अधिकृत 23 पब आणि बार आहेत ज्याच्याकडे परवाना आहे. तर मग 100 बार, पब कोणाच्या आशीर्वादने चालतात.

Sushma Andhare, Devendra Fadanvis and Chandrakant Patil
Uddhav Thackeray : मुलींच्या मोफत शिक्षणावरुन ठाकरेंचा चंद्रकांतदादांना टोला; म्हणाले, आश्वासनाचं चॉकलेट...

पब आणि बारच्या गोरख धंद्यावर बोलल्यावर शंभूराजे देसाई आम्हाला धमकी देतात, मात्र आम्ही तुमच्या धमकीला आणि नोटीसला घाबरत नाही. शेकडो बार आणि पबची माहिती आमच्याकडे असून देखील त्याच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागचे अधिकारी चरणसिंग राजपूत काहीच करवाई करत नाही. तरी देखील राजपूत यांच्याचे निलंबन का होत नाही. त्यांच्यावरती कोणाचा वरदहस्त आहे. चरणसिंग राजपूत आणि देसाई यांचे काय संबंध आहेत? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

विधानसभा अधिवेशन गुरुवार पासून सुरू झाले असून यावेळी ठाकरे आणि फडणवीस यांनी सोबत लिफ्टने प्रवास केला. यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे. म्हणजे विषय संपला आहे, असं काहीही नाही. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाही त्यामुळे एकाच लिफ्ट मधून ते गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आल्याचा नाही.

Sushma Andhare, Devendra Fadanvis and Chandrakant Patil
Uddhav Thackeray: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे म्हणाले, महायुतीच्या अपयशाचा खरा चेहरा समोर येऊ द्या, त्यानंतर....

पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिलेल्या चॉकलेट वरून अंधारे म्हणाल्या,चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले आहेत. हे विश्वासघाताचे विषारी घोट सुद्धा पचवून आम्ही परत उभा राहिलो आहे.माध्यमांच्या समोर जरी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिले असले तरी आमची विनंती आहे की जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका. तुमच्या अशा चॉकलेटनी आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही, या भ्रमात राहू नका . वर्धापन दिनादिवशी उद्धव साहेबांनी हे स्पष्ट केला आहे की भुजबळ साहेबांना बाबतची सुद्धा भूमिका स्पष्ट केली आहे, असेही अंधारे यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com