Sushma Andhare News : भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या बद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली. मात्र, या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.
तर ''शाई कुठे लावावी याचं भान असलं पाहिजे. शाईचा उपयोग लेखणीसाठी झाला पाहिजे. त्याचबरोबर हाताला मतदान करण्यासाठी झाला पाहिजे. चंद्रकांत पाटील यांचा शब्दही चुकीचा आहे. मात्र तसंच काल जी घटना घडली देखील चुकीची आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. तर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीवर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाष्य केलं आहे.
अंधारे म्हणाल्या, ''काल पुण्यात जी घटना घडली ती निषेधार्थ आहे. मी माझी शाई कुठे वापरावी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे. मात्र भाजपचेच नेते सातत्याने अशी वक्तव्य का करत आहेत?'' असा सवाल उपस्थित करत ''मी १३ डिसेंबरच्या पुणे (Pune) बंदमध्ये सहभागी होणार आहे'', असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
शाईफेकीची घटना नेमकी काय?
चंद्रकांत पाटील हे शनिवारी चिंचवडमध्ये (Chinchwad) एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला. त्यानंतर शाईफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.