Sushma Andhare News : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या बद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली. मात्र, या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या संस्थेच्या सदस्य पदाचा राजीनामा देत त्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
''आपण डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या संस्थेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडून आपली मनधरणी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
''डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन संस्थेच्या सदस्य पदाचा राजीनामा मागे घ्या, या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. मी संस्थेच्या कामाविषयी काही बोललो नाही. त्यामुळे आपण राजीनामा मागे घ्यावा'', अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली असल्याचं अंधारे म्हणाल्या आहेत. दरम्यान, आता चंद्रकांत पाटलांच्या मनधरणीवर सुषमा अंधारे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.