Sushma Andhare : गृहराज्यमंत्री योगेश कदमांना तोंडघशी पाडले, सुषमा अंधारेंनी सचिन घायवळवर दाखल गुन्ह्यांचे पुरावेच दाखवले

Sushma Andhare Vs Yogesh Kadam Sachin Ghaywal : कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याने गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत आले आहेत. सुषमा अंधारेंनी निलेशवर दाखल गुन्ह्यांची यादीच दिली आहे.
 Sushma Andhare
Sushma Andharesarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशी पळून गेला आहे. त्याचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यामुळे सचिन घायवळला बंदुकीचा परवाना मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यात कदम यांनी ट्विट करत शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते, असे म्हटले.

कदम यांन नियमानुसार त्यांना शस्त्र परवाना दिल्याचे नमुद केले. तसेच उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे, असे देखील सांगितले. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सचिन घायवळ दाखळ गुन्ह्याची यादीच दिली आहे.

अंधारे म्हणाल्या, 'काल कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ शस्त्र परवाना प्रकरणांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, शस्त्रपरवाना देत असताना कुठलाही गुन्हा दाखल नव्हता.पण सचिन घायवळ याच्यावर फक्त खुनाचा गुन्हा नाही तर मोक्का अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल होते. विशेष अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जाऊ नये असा पोलिसांचा अहवाल होता. तरीसुद्धा योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला.'

 Sushma Andhare
Ajit Pawar: अजितदादांनी शहराध्यक्षच फोडला! लगेचच केली राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी नियुक्ती; शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का!

अंधारे यांनी गृहविभागाने सचिन घायवळ याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा हवाला देत त्याला शस्त्र परवाना देण्यास विरोध केला असल्याचे गृहविभागाचे पत्र दाखवत थेट पुरावाच दिला आहे. या पुराव्यातून योगेश कदम हे खोटे बोलत असल्याचे अप्रत्यक्ष निशाणा अंधारे यांनी साधला आहे.

'योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत एका गुंडाला अभय देण्याचा आणि त्याला बळ पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. सबब योगेश कदम तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही तात्काळ गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या.', अशी मागणी देखील अंधारे यांनी केली आहे.

सचिन घायवळ दाखल गुन्ह्यांची यादी देखील त्यांनी दिली आहे. त्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 118 /2010 भा द वि कलम 143 147 ,148, 149 , 307, 427, 428 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3 4 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 एक ,135 ,142 अन्वये गुन्हा दाखल आहे.

दत्तवाडी पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 82 ऑब्लिक 2010 भारतीय दंड विधान कलम 120 व 302 , 307, 343, 147, 148 , 149 सह शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3, 4, 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 1 सह 135 मोका कलम 3 (1)(१), 3 (1) (२) , 3(4) अन्वये गुन्हा दाखल आहे. तसेच शिवाजीनगर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 3082/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे नमूद केले आहे.

 Sushma Andhare
OBC Reservation : 'आरक्षणाला धक्का लागू नये, अन्यथा आमच्या जगण्याला...' व्हॉट्सअप स्टेटस ठेवत छगन भुजबळांच्या समर्थकाने संपवलं जीवन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com