Court News : स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. आरोपीने साताऱ्याची बस तिकडे लागते, अशी दिशाभूल करून तरुणीवर बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन बलात्कार केला होता.
या खटल्याच्या सुनावणीस शनिवार (ता.21) पासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तरुणीची साक्ष नोंदविण्यात आली. घटनाक्रम कथन करताना तिला अश्रू अनावर झाले. तरुणीची मानसिक स्थिती अस्वस्थ झाल्याने न्यायालयाने कामकाज तहकूब केले.
या प्रकरणी पोलिसांनी दत्तात्रेय गाडे याला अटक केली होती. जून २०२६ मध्ये विशेष न्यायालयात त्याच्यावर आरोप निश्चित केले होते. यामध्ये विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी ८७ साक्षीदार, तसेच आरोपीच्या विरोधातील पुराव्यांची यादी न्यायालयात सादर केली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली.
तरुणीची मानसिक स्थिती अस्वस्थ असल्याने न्यायालयाने कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला. खटल्याची पुढील सुनावणी पाच डिसेंबरला होणार आहे. खटल्यात ॲड. मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. न्यायालयीन कामकाजात ॲड. प्रथमेश शिंगणे, ॲड. राकेश सोनार, ॲड. राधिका नावंदर-जोशी त्यांना सहकार्य करत आहेत.
पीडीत तरुणी स्वारगेट स्थानकात फलटणला जाण्यासाठी आली होती. मात्र, तिथे असलेल्या एक जणाने फलटणाला जाणारी बस दुसरीकडे थांबली असल्याचे सांगितले. बस दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीला बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये चढवले. तरुणी पाठोपाठ आरोपीसुद्धा त्या एसटी बसमध्ये घुसला आणि त्याने तरुणीवर अत्याचार केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.